सप्तरंग

पक्ष्यांचं नंदनवन - भिगवण

अरविंद तेलकर

वीकएंड पर्यटन
निसर्ग आणि मानवाचं नातं अतूट आहे. माणूस घराच्या आवारात किंवा सदनिकेत राहणारा असो, अंगणात, टेरेसवर किंवा अगदी बाल्कनीत तो हमखास फुलझाडं लावतोच. त्याच्या याच सोसापायी तो जंगलांमध्ये वन्य पशू-पक्ष्यांना पाहण्यासाठी ताडोबा, पेंचसारख्या अभयारण्यांना भेट देतो. असंच एक अभयारण्य पुण्याजवळ आहे. त्याचं नाव आहे भिगवण. उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेलं आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं दरवर्षी आवर्जून येणारे हजारो पाणपक्षी.

भिगवणचा जलाशय हा पाणपक्ष्यांसाठी जगभरात ख्यात पावलेला आहे. इथं फ्लेमिंगो (रोहित-अग्निपंख), पेंटेड स्टॉर्क (चित्रबलाक-रंगीत करकोचा), ग्रे हेरॉन (राखी बगळा), ग्रेट इग्रेट (मोर बगळा), कॉमन कूट (चांदवा), ब्लॅक हेडेड आयबिस (काळ्या डोक्‍याचा शराटी), ब्राऊन हेडेड गल (तपकिरी डोक्‍याचा कुरव), ब्लॅक हेडेड गल (काळ्या डोक्‍याचा कुरव), एशियन ओपनबिल (मुग्धबलाक), पर्पल स्वॅम्पहेन (जांभळी पाणकोंबडी) पर्पल हेरॉन (जांभळा करकोचा), लिटल कॉर्मोरंट (छोटा पाणकावळा), ग्रेट कॉर्मोरंट (मोठा पाणकावळा), रुडी शेल्डक (चक्रवाक), नॉर्दर्न शॉवेलर थापट्या), युरोपिअन स्पूनबिल (चमचा) यांसारखे अनेक प्रकारचे पक्षी आणि पक्षी व माशांची शिकार करणारे ग्रेटर स्पॉटेड ईगल (मोठा गरुड), ओस्प्रे (कुक्री), वेस्टर्न मार्श हॅरियर (पाणघार) यांसारख्या शिकारी पक्ष्यांच्या आगमनाकडं पक्षिप्रेमी आकर्षित झाले नसते, तरच नवल. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कुंभारगावसारखी काही गावं गेल्या काही वर्षांत नवी पर्यटनस्थळं बनली आहेत. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून आणि परदेशांतूनही पक्षिप्रेमी या ठिकाणी गर्दी करताना दिसतात.

उजनी जलाशयावर येणाऱ्या या पक्ष्यांचे थवे गुजरात, लडाख, सायबेरिया युरोप, ऑस्ट्रेलियासारख्या दूरच्या देशांमधून हजारो किलोमीटरचा अचूक प्रवास करत, सप्टेंबरपासूनच भिगवणच्या जलाशयावर हंगामी मुक्कामासाठी येतात. काही जातींच्या पक्ष्यांचे थवे, ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपासूनच येण्यास सुरवात होते. सप्टेंबरपासूनच या परिसरात पक्षिप्रेमींच्या वाऱ्या सुरू होतात. या पक्ष्यांचा मुक्काम मार्च-एप्रिलपर्यंत असतो. जलाशयात भरपूर खाद्य उपलब्ध असल्यानं पक्ष्यांसाठी ही पर्वणीच असते. एप्रिलपासून परदेशी पाहुण्यांची परतण्याची लगबग सुरू होत असली, तरी स्थानिक स्थलांतरित पक्षी मात्र एप्रिलपर्यंत इथंच तळ टाकून असतात.

कसे जाल? 
पुणे ते भिगवण-कुंभारगाव अंतर सुमारे ११० किलोमीटर. मुंबईपासूनचे अंतर २६० किलोमीटर. सोलापूरपासून १५५ किलोमीटर. भिगवणपासून सोलापूरच्या दिशेनं अंदाजे चार किलोमीटरवर कुंभारगावचा फाटा लागतो. जलाशयाच्या परिसरात रात्रीचा निवास आणि भोजनाची चांगली व्यवस्था. बोटीतून जलाशयाची फेरी मारण्याची सोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT