weekly horoscope
weekly horoscope 
सप्तरंग

साप्ताहिक राशिभविष्य (ता. २८ फेब्रुवारी २०२१ ते ०६ मार्च २०२१)

श्रीराम भट saptrang@esakal.com

अनंत जीबीची कनेक्‍टिव्हिटी !
मनबुद्धीच्या संधीफटीत दडून आपले विचित्र प्रताप दाखवणारा माणसाचा अहंकार मोठा अजब आहे. माणूस हा एक देहाभिमानाचा वाराच आहे, असं ज्ञानदेव म्हणतात आणि हाच वारा आकाशातील अवकाशात ग्रहगतीच्या नियतीचे पदर पकडत आत्मघात करून घेत असतो. 

माणूस हे एक भावबंधनच असून या भावबंधनाचा श्‍वास पकडणाराच माणूस या पदाला प्राप्त होत असतो. भावबंधनाचा नाजूक श्‍वास माणसाला सुगंधित झुळकीसारखा आनंद देत असतो. हल्ली माणसाचं जीवन अशाप्रकारच्या भावबंधनाला मुकत चाललं आहे. भावबंधनाचे श्‍वास हल्ली एकमेकांत मिसळतच नाहीयेत! सध्याच्या कोरोना व्हायरसनं माणसांच्या भावबंधनांचा श्‍वास एकाअर्थी कोंडला जातोय. भावबंधनावर आघात करणारा एक वेगळाच कोरोना व्हायरस माणसाच्या मनाला ग्रासू पाहत आहे. आता या मानसिक कोरोनाला कुठली लस टोचायची बरं ? 

मित्रहो, माणसाच्या शरीराला वागवणारा माणूस, एक मन जपत असतो. सोशल डिस्टन्सिंग हे शरीराला आहे; मनाला नाही. मंदिरे जरी दर्शनाला किंवा पूजेला बंद झाली, तरी माणसाचं मन भावबंधनातून कैलासाला, बद्रीनाथाला, काशीविश्‍वेश्‍वराला किंवा तिरुपतीला जाऊ शकतं. माणसाचा समर्पित भाव हा मनाची अनंत जीबीची कनेक्‍टिव्हिटी साधू शकतो आणि ही अनंताची कनेक्‍टिव्हिटी साधून देणारीच माघी पौर्णिमेनंतरची माघ वद्य प्रतिपदा होय ! बुध - गुरू सहयोगाच्या पार्श्‍वभूमीवर येणारी आजची प्रतिपदा आजच्या रविवारच्या सूर्योदयाच्या दर्शनातून आपल्या मनाचा कोंडमारा दूर करून अनेक तीर्थस्थानांचं दर्शन घडवून आणेल ! तेसुद्धा गाभाऱ्याच जाऊन ! 

नोकरीत बढतीची चाहूल
मेष :
गुरू-बुध सहयोगाचं फील्ड ता. दोन व तीन हे दिवस मोठे सुंदर. तरुणांनो, मारा चौकार-षटकार. मुलाखती द्याच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची चाहूल. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ऑनलाइन विवाहस्थळं क्‍लिक होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार भाग्यसूचक. 

विवाहयोगाची शक्यता
वृषभ :
मृग नक्षत्रांच्या व्यक्तींना बुध-गुरू शुभ योगाचं एक पॅकेज राहील. ता. पाचचा दिवस मोठा शुभ. नोकरीच्या मोठ्या संधी. व्यावसायिक वादग्रस्तता सुटेल. कृत्तिका नक्षत्रांच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरुवात विशिष्ट गुप्तचिंता घालवणारी. रोहिणी नक्षत्राच्या मंडळींना विवाहयोग. 

जुन्या गुंतवणुकीतून 
मिथुन :
सप्ताहातील गुरू-बुध सहयोग ता. दोनचा अंगारकीचा चंद्रोदय भाग्योदयातून साजरा करेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुप्तधनाचा लाभ शक्य! जुन्या गुंतवणुकींतून लाभ. थोरामोठ्यांच्या मध्यस्थींतून भाग्य उलगडेल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दोन व तीन हे दिवस मोठ्या कनेक्‍टिव्हिटीचे. परदेशात भाग्योदय. 

नोकरी व्यवसायात उत्तम पर्याय
कर्क :
सप्ताहातील राशींच्या एक्‍स्चेंजमधील लाभसंपन्न रास. जनसंपर्कातून मोठे लाभ. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह सतत ग्रीन सिग्नल देणारा. ता. दोन ते चार हे दिवस आत्यंतिक प्रवाही. विशिष्ट नोकरी-व्यावसायिक उत्तम पर्याय पुढे येतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाचचा दिवस मोठ्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवेल. भाजणं-कापणं जपा. 

वरिष्ठांची मर्जी राखा
सिंह :
सप्ताहात घरातील वाद टाळा. नोकरीत वरिष्ठांची मनं सांभाळा. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना उभारी देणारा. ता. दोन ते चार हे दिवस पूर्वा नक्षत्राच्या तरुणांना नोकरीच्या मुलाखतींतून यश देणारा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दोनचा अंगारकीचा चंद्रोदय मोठा भाग्यसूचक. विशिष्ट सन्मान. 

नोकरीतला प्रोजेक्ट पूर्ण होईल
कन्या :
सप्ताहाची सुरुवात गुरूबळातून होईल. सप्ताहात महत्त्वाच्या कामांत हात घाला. सप्ताहातील बुध-गुरू सहयोगाची पार्श्‍वभूमी हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट शुभारंभ करून देईल. नोकरीतील एखादं प्रोजेक्‍ट पूर्ण कराल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचे ता. दोन आणि पाच हे दिवस पतप्रतिष्ठा वाढवणारे. 

शैक्षणिक यश व नोकरीत सुवार्ता
तूळ :
सप्ताह गुरू-बुध सहयोगाच्या पार्श्‍वभूमीवर तरुणांना उत्तमच. थोरामोठ्यांच्या सहकार्यातून मोठी कामे. ता. दोन ते पाच हे दिवस गाठीभेटी, करारमदार व मुलाखतींतून साध्य करणारे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती लाभ करून घेतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना अंगारकीचा दिवस शैक्षणिक यशाचा. नोकरीत सुवार्तेचा. 

बॅंकेची कामे होतील
वृश्‍चिक :
आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. व्यावसायिक उलाढाली होतील. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अंगारकी चतुर्थी पुत्रोत्कर्षाच्या वार्ता देईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. पाचचा दिवस अतिशय शुभलक्षणी. बॅंकेची कामे. काहींची कर्जवसुली. 

सार्वजनिक प्रश्‍न सोडवाल
धनू :
सप्ताह राश्‍याधिपती गुरूच्या विशिष्ट अवस्थेतून आपणास मोठा धीर देणाराच. विशिष्ट सामाजिक किंवा सार्वजनिक प्रश्‍न सोडवाल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीचा लाभ. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी दुर्मिळ विवाहयोग. सप्ताहाचा शेवट मंगळभ्रमणातून ओरखडे काढणारा. ठेचा लागतील. घरातील लहान मुलं जपा. 

मोठ्या भाग्योदयाची चाहूल
मकर :
सप्ताहात साडेसाती विसराल. आजूबाजूस मंगलवाद्ये वाजतील. आजचा रविवार तरुणांना सुखस्वप्नांत ठेवेल. अर्थात मोठ्या भाग्योदयाची चाहूल लागेल. श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. दोन ते चार हे दिवस चढत्या क्रमाने शुभ आणि सुसंगत. विशिष्ट कोर्टप्रकरण जिंकाल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनप्राप्ती. 

असंगाशी संग टाळा
कुंभ :
मंगळभ्रमणातून मानसिक किंवा शारीरिक ओरखडे बसू शकतात. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी असंगाशी संग टाळावा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. पाच व सहा हे दिवस थोरामोठ्यांच्या गाठीभेटींचे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात पुत्रचिंता जाऊन धन्यता वाटेल. कलाकारांना लाभ. 

व्यवसायात यश 
मीन :
सप्ताहात राश्‍याधिपती गुरू ग्रहयोगांतून पडद्यामागचा सूत्रधार राहील. सहजगत्या मोठी कामे. व्यावसायिक हालचाली यशस्वी होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. दोनची अंगारकी तपपूर्तीची. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. नवपरिणितांचे भाग्योदय

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT