Test-Tube-baby
Test-Tube-baby 
सप्तरंग

टेस्ट ट्यूब बेबीची काय आहे कथा आणि व्यथा!

डॉ. भारती ढोरे-पाटील

वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्री रोग तज्ज्ञ
जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राउनचा जन्म २५ जुलै १९७८ या दिवशी झाला. त्याच दिवशी लाखो मुली जन्माला आल्या असतील, पण लुईस ब्राउनचा जन्म हा एक ऐतिहासिक क्षण होता. कारण ती जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी होती!

ज्या तंत्रज्ञानाने लुईसचा जन्म झाला त्याला ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. आता ते सर्रास, सर्वत्र वापरले जाणारे तंत्रज्ञान असले, तरी अशा पद्धतीने कृत्रिम गर्भधारणा करून बाळाला जन्म देता येईल यावर तोपर्यंत कोणाचाही विश्‍वास नव्हता. हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स यांना २०१०चे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला, पण जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीनंतर बरोबर अवघ्या ६७ दिवसांनी कोलकात्यामध्ये भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा, म्हणजेच जगातल्या दुसऱ्या टेस्ट ट्यूब बेबीचा - कानुप्रिया अग्रवाल ऊर्फ दुर्गा यांचा जन्म झाला. परंतु त्यांना जन्म देणाऱ्या डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांच्या वाट्याला फक्त उपहास आणि अपमान आला.

एखादे तंत्रज्ञान साध्य झाले, की आणखी खोलात जाऊन त्यावर सखोल विचार आणि संशोधन करून वेगवेगळ्या असाध्य गोष्टी शक्य करून दाखवणे हे माणसाचे वैशिष्ट्य! टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानाला मात्र या बाबतीत चपखल बसते. टेस्ट ट्यूब बेबीच्या उपचारपद्धती, त्यातील अनेक सोयी, अनेक पर्याय, वेगवेगळे नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक असाध्य गोष्टी साध्य झाल्या आहेत. परंतु, हे सगळे गुंतागुंतीचे व आव्हानात्मक आहे.

यातील प्रत्येक उपचार पद्धतीत ज्ञान, कौशल्य, अनुभव यांची गरज आहे, तेवढीच गरज सर्जनशीलतेची आणि जबाबदारीचीही आहे. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे टेस्ट ट्यूब बेबीच्या बाबतीतही आहेत. काही कथेच्या बाजू आणि काही व्यथेच्याही बाजू आज पाहायला मिळतात.
(क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT