सप्तरंग

त्यांचा नकारही विचारांना प्रवृत्त करणारा

महेंद्र सुके

मुंबई : भारतात साहित्य कलाकृतींसाठी प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी. ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला हा सन्मान जाहीर झाला आणि तेवढ्याच तत्परतेने खरे यांनी तो स्वीकारणार नाही, असे जाहीर करून  साहित्य जगताला चकित केले.  

कलावंत त्याच्या वाट्याला आलेले अनुभव कलाकृतीतून मांडत असतो. कुणी कविता करतो, कुणी कादंबरी लिहितो. कुणी चित्र काढतो. कुणी नाटक लिहितो. कुणाला सिनेमा करावासा वाटतो. ज्याला जे माध्यम व्यक्त होण्यासाठी आवडतं, त्यातून कलावंत व्यक्त होत असतो. अनंत यशवंत खरे (नंदा खरे) हे मुळात स्थापत्य अभियंते. रस्ते, धरणं, पूल, कारखाने बांधणाऱ्या ‘खरे आणि तारकुंडे कंपनी’त त्यांनी आयुष्याची ३४ वर्षे भागीदार आणि व्यवस्थापकीय संचालक अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्या निमित्ताने समाजातील माणसांचे जगणे जवळून त्यांनी पाहिले आहे. त्यावर चिंतन करून, कथा, कादंबरी, ललित अशा विपुल साहित्यकलाकृती आविष्कृत केल्या आहेत.

सातत्याने निखळ विज्ञानवादी भूमिका घेऊन लेखन करणारे नंदा खरे यांनी ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’, ‘कहाणी मानवप्राण्याची’, ‘जीवोत्पत्ती... आणि नंतर’ ही विज्ञानविषयक पुस्तके आहेत. त्यांच्या साहित्यकृती अनेक नामवंत प्रकाशनसंस्थांनी प्रकाशित केली असून, त्यात दगडावर दगड विटेवर वीट (आत्मकथन), ‘नांगरल्याविण भुई’, ‘वीसशे पन्नास’ ‘उद्या’ (कादंबऱ्या), वाचताना, पाहताना, जगताना (ललित) या पुस्तकांचा समावेश आहे. खरे यांनी विचारवाही वाङ्‌मयीन संस्थांसाठी कार्य केले आहे. नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे ते संपादकपदही त्यांनी सांभाळले होते.

नंदा खरे हे  शांत,  प्रेमळ व्यक्तिमत्त्व. स्वच्छ जगणे ही त्यांच्या जीवनाची गुरुकिल्ली. आयुष्यातील उमेदीचा काळ बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदारीत घालविला. मोठमोठी धरणं बांधतांना आणि रस्त्यातील महत्त्वाची ठिकाणं सुशोभित करतानाच, त्यांनी त्यांच्या स्वत:च्या आयुष्याचं विणकामही तेवढंच निष्कलंक, स्वच्छ आणि देखणंही केलं आहे. त्यांच्या कलाकृतीही माणसांशी नातं सांगणाऱ्या आहेत. तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपले माणूसपण विसरू नये, याची जाणीव करून देणाऱ्या आहेत. आयुष्यात आलेल्या याच अनुभवाच्या चिंतनातून जन्माला आली ‘उद्या’ ही कादंबरी. २०१५ मध्ये  साली ‘मनोविकास’ने ती प्रकाशित केली. या कादंबरीला साहित्य अकादमीने पुरस्कार जाहीर करून गौरविले; पण खरे यांनी तो सन्मान स्वीकारणार नाही, असं नम्रपणे सांगून साऱ्यांनाच धक्का दिला आहे.  ‘कुठलाही पुरस्कार स्वीकारणार नाही, हे चार वर्षांपूर्वीच ठरवलेलं आहे. ती माझी भूमिका आहे,’ असं ते म्हणाले. कुणाला पुरस्कार मिळाला नाही, म्हणून आकांडतांडव करणाऱ्या समाजात एक कलावंत पुरस्कार स्वीकारणार नाही, ही त्यांची भूमिका असल्याचं सांगतो. ही भूमिका जेवढी विनम्र आहे, तेवढीच ती स्फोटक, समाजमन अस्वस्थ करणारी आहे.ही भूमिका चिंतन करायला लावणारीही आहे.

त्यांच्या भूमिकेमागे ही कारणे असू शकतील.

1. साहित्य क्षेत्रात असंख्य पुरस्कार वेगवेगळ्या संस्थांमार्फत दिले जातात. त्या संस्थांना कुणाची तरी पाठराखण असते. ती कधी राजकीय असते. कधी विशिष्ट विचारधारेची असते. खरे यांना अशा कोणत्याही पाठराखण करणाऱ्यांकडून स्वत:चा सन्मान करून घ्यायचा नसावा.

2. आपल्या जवळचे, दूरचे, स्वकीय, परके समजून पुरस्कार दिले जातात, काहींना नाकारले जातात. त्यात व्यवहार, कंपूशाही अशी चर्चा रंगते. ती चर्चा आपल्या साहित्यकलाकृतीची होऊ नये, असेही वाटत असण्याची शक्यता आहे.

3. खरे हे पर्यावरणवादी, मानवतावादी आहेत. माणसाच्या जगण्यावर बोलणारे आहेत. ज्या व्यवस्थेविरुद्ध लिहायचे, त्यांच्याकडूनच पुरस्कार घेऊन सन्मानही करून घ्यायचा, हा दुटप्पीपणा त्यांना टाळायचा असू शकतो.  

4. आताची सामाजिक, सांस्कृतिक जी परिस्थिती आहे, त्याचा निषेध म्हणून केंद्र सरकारच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारला असेल.

अशा स्वरुपाचे  विविध मतप्रवाह खरे यांच्या नकारातून जन्माला आले  आहेत. नेमके काय, हे नंदा खरे यांचाच आतला आवाज सांगू शकेल. काहीही असलं तरी एका साहित्यकाराला पुरस्कार स्वीकारायचा नाही, ही भूमिका घ्यावी लागते म्हणजे गर्द काळोखात ‘उद्या’ची तीव्र अस्वस्थता नांदते आहे, असे म्हणावे लागेल.


why anant yashwant khare also known as nanda khare refused sahitya akadami award

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT