स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार sakal
सप्तरंग

स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार : पाहिला याचि देही... याचि डोळा!

भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस. सुमारे पंच्याहत्तर वर्षांपूर्वीचा तो सुवर्ण दिन अनुभवलेली पिढी आजही आपल्या अवतीभोवती आहे.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस. सुमारे पंच्याहत्तर वर्षांपूर्वीचा तो सुवर्ण दिन अनुभवलेली पिढी आजही आपल्या अवतीभोवती आहे. अर्थात, ती पिढी आता ८५-१०० च्या घरात आहे. १५ ऑगस्ट १९४७चा दिवस डोळ्यांनी पाहिलेल्या या पिढीच्या तोंडून अनुभव ऐकणे खरोखरच रोमांचकच आहे.

तिरंग्यासोबत भगवाही : बापूसाहेब पुजारी, सांगली

१९३५ ला मी नृसिंहवाडीतून शिकायला सांगलीत आलो आणि कायमचा सांगलीकर झालो. सांगलीतील तो पहिला स्वातंत्र्यदिन समस्त भारतीयांसाठी आनंद आणि दुःख अशा दोन्ही भावनांनी व्यापलेला होता. त्याचदिवशी नगरपालिकेसमोर शंभरावर लोकांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष धोंडिराम थोरात यांच्याहस्ते ध्वजवंदन झाले. त्यांनी तिरंग्यासोबतच भगवा ध्वज लावावा, असा आग्रह धरला. मात्र त्यावेळचे काँग्रेसचे पुढारी देशपांडे यांना विरोध केला. सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबा करंदीकर, बुवासाहेब गोसावी, वि. स. पागे अशी मंडळी त्यावेळी सांगलीत होती. नगराध्यक्षांनी मात्र तिरंग्याच्या खालोखाल भगवा ध्वज लावून दोन्ही झेंड्यांना मानवंदना दिली. त्यावरून बाचाबाचीही झाली. त्यानंतर शहरात मिरवणुका निघाल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरावर तिरंगा ध्वज लावले होते. त्यादिवशी दिल्लीतील कार्यक्रम आम्ही हरभट रस्त्यावरील नाना देवधरांच्या हॉटेलच्या दारात लावलेल्या रेडिओवरून ऐकला होता.

स्वातंत्र्यसैनिकांना मिळाला सन्मान : गंगाधर लकडे, विटा

प हिल्या स्वातंत्र्यदिनी दिवाळीसारखा आनंदोत्सव होता. त्यादिवशी स्वातंत्र्यसैनिकांना शासन यंत्रणेने निमंत्रण देऊन बोलावून घेतले होते. विटा येथे तहसीलदार कार्यालय व गांधी चौकातील नगरपालिका कार्यालयासमोर ध्वजवंदन झाले. हा समारंभ माझ्या चांगलाच स्मरणात आहे. शाळेतील मुलांची प्रभातफेरी निघाली होती. पुढे हा रिवाजच पडला. गांधी चौकात मुले एकत्र जमायची. तेथे मुलांना खाऊ व जिलेबीचे वाटप व्हायचे. स्वातंत्र्यदिनादिवशी खो-खो, लांब उडी, उंच उडी यासह अन्य स्पर्धा सुरू झाल्या. त्यातील विजेत्यांना चॅम्पियनशीप दिली जात असे. त्यांचा सत्कार व्हायचा.

ट्रकमधून मुलांचा जल्लोष : अण्णा डांगे, इस्लामपूर

भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मी अकरा वर्षांचा होतो. इस्लामपूरच्या विद्यामंदिर हायस्कूलात इयत्ता पाचवीत होतो. १५ ऑगस्टच्या मध्यरात्री आणि त्या दिवसभर आम्ही शाळकरी मुले ट्रकमध्ये बसून गावभर जल्लोष करीत फिरलो होतो. ट्रकमधे पिशव्या भरून खाऊ होता. स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या जात होत्या. घराघरावर झेंडा फडकवला गेला होता. आमच्या घरावरही आम्ही झेंडा लावला होता. प्रत्येक माणूस स्वातंत्र्याच्या धुंदीत, आनंदात, जल्लोषात, उत्साहात दिसत होता. गोड-धोड खाण्यापिण्याची तर चंगळ होती. आमच्या शाळेत वाळवा तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष एस. पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. इस्लामपुरात मामलेदार कचेरीवर रात्री बारा वाजता ध्वज फडकविण्यात आला होता. त्याला आचार्य जावडेकर यांच्यासह अनेक मोठी माणसे उपस्थित होती.

मिरवणुका अन् मिठाई

जरीना अब्दुल शेख, इस्लामपूर

आ म्ही त्यावेळी बहे येथे रहायला होतो. पती त्यावेळी हुबालवाडीच्या शाळेत शिकवायला जात होते. त्यांनीच देश स्वतंत्र झाल्याचा आनंद म्हणून त्या १५ ऑगस्टला घरात मिठाई घेऊन आले. गावात चावडीजवळ ध्वजवंदन झाले. त्यादिवशी ग्रामस्थांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष केला. गावातील अनेकांनी लहान मुलांना तेव्हा मिठाई वाटली होती. माझे वय ३४ होते. त्या दिवसाच्या माझ्या आठवणी अगदी लख्ख आहेत. माझे पती त्या दिवसाचे महत्व चांगले जाणून होते. त्यांनी ते सर्वांना सांगितले. हुबालवाडीतून येतानाच ते मिठाई घेऊन गावात आले होते. त्यांनी घरात येताच आपला देश स्वतंत्र झाला, असे ओरडून सांगितले. सर्वांना मिठाई दिली. त्यादिवशी गावात घरोघरी तीच चर्चा होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. लहान मुले भारत माता की जय... वंदे मातरम, अशा घोषणा देत गावात फिरत होते. मोठ्यांना त्याचे कौतुक वाटत होते. आज वय वर्षे १०८ झाले. मात्र तो दिवस तसाच माझ्या स्मरणात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Chinnaswamy Stadium Update: 'आयपीएल' आधीच ‘RCB’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!, चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल झाला मोठा निर्णय

Devendra Fadnavis : "कमिशनखोरी अन् उन्माद खपवून घेणार नाही"; फडणवीसांचा पुण्याच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कडक इशारा!

Horoscope : माघ महिना सुरू होताच 5 राशींचे भाग्य बदलणार; होणार धनलाभ, खूप वर्षांपासूनची इच्छा होईल पूर्ण, नोकरी-धंद्यात मिळेल मोठे यश

DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

Ration Card Limit: गरजूंसाठी आनंदाची बातमी! रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT