Money esakal
सातारा

आमदारांनी आवाहन करताच मॅप्रो कोविड रुग्णालयासाठी शिक्षकांची 10 लाखांची मदत

भद्रेश भाटे

सातारा : वाई तालुक्‍यातील शिक्षकांना तालुका मॅप्रो कोविड हॉस्पिटलमधील (Mapro Covid Hospital) रुग्णांवरील उपचारासाठी अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनी केले होते. त्यानुसार सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, तहसीलदार रणजित भोसले, गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन मदतीचे आवाहन केले. त्यानंतर तालुक्‍यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी (Teachers) स्वयंस्फूर्तीने जमा केलेला 10 लाख रुपये कोविड मदत निधी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. (10 Lakh Assistance From Teachers In Wai For Mapro Covid Hospital Satara Positive News)

कोविड आजाराची साथ हे मानवतेवर ओढावलेले अस्मानी संकट आहे. या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे श्रम, प्रशासनाचा वेळ आणि सर्वांकडूनच अर्थसाहाय्याची गरज असल्याचे मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.

या वेळी आमदार पाटील म्हणाले, ""कोविड आजाराची साथ हे मानवतेवर ओढावलेले अस्मानी संकट आहे. या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे श्रम, प्रशासनाचा वेळ आणि सर्वांकडूनच अर्थसाहाय्याची गरज आहे. यापूर्वी शिक्षकांनी स्वच्छेने कॉन्सन्ट्रेटर मशिन उपलब्ध करून आपली जबाबदारी पार पाडली आहे. आपण जमा केलेल्या रकमेतून तालुका कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना औषधे, वैद्यकीय सामग्री व नियुक्त कर्मचाऱ्यांचे वेतन यांसाठी खर्च होणार आहे. या खर्चाचा भार लाखो रुपये आहे. अनेक सेवाभावी संस्था, उद्योग यांची आम्ही मदत घेत आहोत. शिक्षकांनी कर्तव्य भावनेतून केलेल्या मदतीमुळे हॉस्पिटलमधील रुग्णांना अधिक चांगले औषधोपचार व दिलासा मिळणार आहे.''

या वेळी उपसभापती विक्रांत डोंगरे, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, विष्णू मेमाणे, साईनाथ वाळेकर, तालुका शिक्षक समितीचे अनिल पिसाळ, महादेव क्षीरसागर, संघाचे सहदेव फणसे, दीपक वाघमारे, राजेंद्र दगडे, महेंद्र जगताप व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. जमा रक्कम तालुका कोविड हॉस्पिटलचे डॉ. मयूर बिरारे यांच्याकडे सभापती चव्हाण, उपसभापती डोंगरे, तहसीलदार भोसले, गटविकास अधिकारी कुसुरकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, मोहन चव्हाण यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आली.

10 Lakh Assistance From Teachers In Wai For Mapro Covid Hospital Satara Positive News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT