Satara Water Crisis Sakal
सातारा

Satara Water Crisis : सातारा जिल्ह्यात अद्यापही १०० टँकर सुरू; शेतीचा प्रश्‍न सुटला; पण पिण्याच्या पाण्याची टंचाई

सद्य:स्थितीत जनतेची तहान भागविण्यासाठी ९६ गावे, ३४० वाड्या-वस्त्यांना १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, पाण्याचा प्रश्‍न मिटण्यासाठी मॉन्सूनची प्रतीक्षा आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. भूजल पातळी दिवसेंदिवस घटत गेली असून, पावसानेही दडी मारली आहे. मे महिना ते जून महिन्याच्या दहा तारखेपर्यंत वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटला आहे. मात्र, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. आता जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात अद्यापही शंभर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

सद्य:स्थितीत जनतेची तहान भागविण्यासाठी ९६ गावे, ३४० वाड्या-वस्त्यांना १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, पाण्याचा प्रश्‍न मिटण्यासाठी मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. मागील मोसमात पावसाने दडी मारल्याने धरणांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जून महिना संपत येऊनही पाण्याची टंचाई सुरू आहे.

मे महिन्यातील मध्यान्हानंतर पावसाने काही विहिरी, बोअरवेलला पाणी आले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अद्यापही भेडसावत आहे. मे महिन्यापर्यंत कडक उन्हाळा जाणवत होता.

मात्र, १५ मेनंतर जिल्ह्यातील अनेक भागांत वळवाच्या पावसाने हजेरी लावली. कोरड्या पडलेल्या अनेक विहिरी, नाले वाहू लागले. दुष्काळातील काही नद्या दुथडी भरून वाहिल्या. त्यामुळे शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍न सुटला तरी पिण्याच्या प्रश्‍न समोर उभा ठाकला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रत्येकजण पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

एक लाख १२ हजार पशुधनाची तहान टॅंकरवर

जिल्ह्यात १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये एक लाख ६० हजार नागरिकांना टॅंकरने पाणी सुरू असून, एक लाख १२ हजार पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. त्यामुळे या दुष्काळाचा फटका पशुधनांनाही बसला आहे.

  • ९६ गावे, ३४० वाड्या-वस्त्यांना १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा

  • पावसाने अनेक ठिकाणी पाझर तलाव व बोअरवेलला पाणी

  • जुलै महिन्यात पाऊस न पडल्यास पिण्याचा प्रश्‍न होणार गंभीर

  • माण तालुक्यात सर्वाधिक ४२ टँकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT