Corona esakal
सातारा

साताऱ्याला मोठा दिलासा! जिल्ह्यात 24 तासात 461 बाधित, तर 1139 जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या (Corona Patient) निकट सहवासितांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 461 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 17 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Officer) दिली आहे. (1139 Citizens Discharged From Hospital In Satara District Today)

जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या निकट सहवासितांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 18(8355), कराड 108 (25850), खंडाळा 10 (11505), खटाव 37 (18816), कोरेगांव 42 (16214), माण 13 (12709), महाबळेश्वर 1 (4211), पाटण 45 (8053), फलटण 22 (27887), सातारा 141 (39112), वाई 22 (12381) व इतर 2 (1243) असे आजअखेर एकूण 186336 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 2 (187), कराड 7(763), खंडाळा 0 (147), खटाव 0 (472), कोरेगांव 1(373), माण 1 (251), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (189), फलटण 0 (277), सातारा 3 (1193), वाई 1(325) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4221 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज 1139 जणांना डिस्चार्ज

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1139 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  • एकूण नमूने – 986888

  • एकूण बाधित – 186336

  • घरी सोडण्यात आलेले – 174432

  • मृत्यू - 4221

  • उपचारार्थ रुग्ण - 8408

1139 Citizens Discharged From Hospital In Satara District Today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahu Maharaj: 'हे' दोन मराठा तरुण होते म्हणून औरंगजेब बालछत्रपतींचे धर्मांतर करु शकला नाही, जाणून घ्या त्यागाचा इतिहास

Avoid Junk Food: आकर्षक पॅकेजिंग, चमचमीत चवीला म्हणा 'नो'! घरीच बनवलेल्या पौष्टिक पर्यायांनी जपा आरोग्य

Latest Marathi News Live Update : गडचिरोली जिल्ह्यातल्या दोन तालुक्यात पाऊस

Irani Cup सामन्यात फुल राडा! विदर्भाचा गोलंदाज अन् दिल्लीकर फलंदाज एकमेकांच्या अंगावर गेले धावून, पाहा Viral Video

Jaggery Health Benefits: दररोज सुपारीएवढा गूळ देतो ताकद, शुद्धी आणि आरोग्याचे चांगले फायदे

SCROLL FOR NEXT