NCP-Shivsena esakal
सातारा

माजगाव : निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा धुव्वा

कृष्णत साळुंखे

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलनं शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवला आहे.

चाफळ (सातारा) : माजगाव विकास सेवा सोसायटीच्या (Mazgaon Vikas Seva Society) 12 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पुरस्कृत यशवंत ग्रामविकास पॅनेलने शिवसेना (Shivsena) पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवला. सर्व जागा जिंकून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा सोसायटीवर फडकावला आहे.

माजगाव येथील विकास सेवा सोसायटीच्या 12 जगांसाठी चुरशीने मतदान झाले. दुपारी मतदानानंतर मतदान केंद्रावर मतमोजणी करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत यशवंत ग्रामविकास पॅनेलचे रविराज पाटील, विनोद पाटील, यशवंत पाटील, शंभूराज पाटील, शिवाजी कदम, दिनकर कदम-पाटील, प्रकाश मोरे, मधुकर वाघमारे, मीना शिखरे, अनिता हिमणे, वसंत कुंभार, युवराज गायकवाड हे उमेदवार विजयी झाले. यापूर्वी श्यामराव बोडके हे बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद गुरव यांनी, तर केंद्रप्रमुख म्हणून जी. जी. कुंभार यांनी काम पाहिले.

Mazgaon Vikas Seva Society

विजयानंतर यशवंत ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, गुलालाच्या उधळणीत जल्लोष केला. विजय उमेदवारांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil), सत्यजितसिंह पाटणकर, अमरसिंह पाटणकर, राजेश पवार, पंचायत समिती सदस्या रूपाली पाटील, मोहनराव पाटील, शिवाजीराव पाटील, भरत वरेकर, माजगावचे सरपंच प्रमोद पाटील, आनंदराव पाटील, रमेश हिमणे, सुरेश जाधव, विक्रम पाटील, सुरेश मोरे, आनंदा धुमाळ, संजय कुलकर्णी, दत्तात्रय देशमुख, चाफळचे सरपंच आशिष पवार, संभाजीराव देशमुख, चाफळचे माजी सरपंच वसंतराव जाधव यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT