UNESCO World Heritage List Pratapgad esakal
सातारा

UNESCO : शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या 'प्रतापगड'ची वारसा स्थळासाठी शिफारस; 'या' 12 किल्ल्यांचाही समावेश

प्रतापगड हा किल्ला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे.

अभिजीत खुरासणे

प्रतापगड हा किल्ला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध करण्यात आला होता.

महाबळेश्‍वर : युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रतापगड (Pratapgad), पन्हाळगड, रायगड, शिवनेरीसह एकूण बारा किल्ल्यांचे २०२४-२५ साठी भारताने ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’च्या माध्यमातून नामांकन केले आहे. या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या वतीने युनेस्कोला (UNESCO) शिफारस करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडसह प्रतापगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा या नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

हे किल्ले मराठा राजवटीमधील सामरिक शक्तींचे दर्शन घडवणारे आहेत. हे किल्ले मराठा शासकांच्या असाधारण पराक्रमाने नावारूपाला आलेले आहेत. यातील अनेक किल्ल्यांची बांधणी शिवकालात, तसेच त्यानंतर झाल्याचे दिसून येते. प्रतापगड हा किल्ला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध करण्यात आला होता.

कोल्हापूरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेला पन्हाळागडाचीही शिफारस केली जाणार आहे. इतिहासामध्ये पन्हाळगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच किल्ल्याला सिद्धी जोहरने वेढा दिला होता. या वेढ्यातून शिवछत्रपती विशाळगडाच्या दिशेने शिताफीने निसटून गेले होते. पन्हाळगडावर सज्जा कोठी, तीन दरवाजा, अंधारबाव, धर्मकोटी, अंबरखाना, पुसाटी बुरूज दिमाखात उभा आहे.

महाराष्ट्रातील किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा, ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर वारसा स्थळाची अंतिम मोहोरही उमटेल. या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळेल.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : मोदींचा मोठा संकल्प; स्वावलंबी भारतासाठी देशाला दिला खास संदेश

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT