सातारा

सातारा जिल्ह्यातील 14 कोविड सेंटर आजपासून बंद

प्रशांत घाडगे

सातारा : कोरोना रुग्णांवर उपचार व संशयित रुग्णांना आयसोलेशनसाठी जिल्ह्यात एकूण 26 कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. मात्र, सद्यःस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आजपासून जिल्ह्यातील 14 सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करून 12 सेंटर सुरू ठेण्यात आली. 

मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हाभरात कोविड केअर सेंटर सुरू केली. त्यामध्ये बाधित रुग्ण, संशयित रुग्णांसाठी विविध प्रकारचे वॉर्ड तयार करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित आल्याने तालुक्‍यात साधारण एक कोरोना सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये सातारा, जावळी, वाई, महाबळेश्‍वर, कोरेगाव, माण, कऱ्हाड, फलटण, खंडाळा, पाटण या तालुक्‍यांत एक, तर खटाव तालुक्‍यात दोन केअर सेंटर सुरू ठेवली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. या सेंटरमधील रुग्णांना जवळच कार्यरत असलेल्या दुसऱ्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्‍यात आल्याने 14 कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहेत. रुग्णांची संख्या वाढल्यास बंद केलेली सेंटर पुन्हा कार्यान्वित केली जातील. 

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

SCROLL FOR NEXT