सातारा

नांदलापुरला 15 दगडखाणी सील! कऱ्हाड तहसीलदारांच्या कारवाईचा धडाका

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दगड खाणींसाठी उत्खनन केले जाते.

कऱ्हाड (सातारा): नांदलापुर (ता. कऱ्हाड) येथील दगडखाणी सील करुनही रात्रीच्या वेळी अवैध उत्खन्नन केले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची माहिती मिळाल्यावर काल रात्री संबंधित 15 खाणी पुन्हा सील करुन त्याकडे जाणारे रस्ते हे बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 12 क्रशरही सील करण्यात आले आहे. संबंधितांना नोटीसाही देण्यात आल्याची माहिती प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांनी आज दिली.

कऱ्हाड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात दगड खाणींसाठी उत्खनन केले जाते. ते करताना अनेकदा अवैधरित्या उत्खनन होत असल्याचे महसूल विभागाने यापुर्वी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. नांदलापुर येथील खाणीतून अवैधरित्या उत्खनन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन संबंधित कारवाई करण्यात आल्याचे तहसीलदार देवकर यांनी सांगितले. ते म्हणाले, नांदलापूर येथे सरकारी जागेतील गट नंबर 410 मध्ये सात खाणी आहेत. तर खासगी जागेतील गट नंबर 409 मध्ये आठ खाणी आहेत. मुदत संपल्याने या खाणी महिन्यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. तरीही या खाणपट्ट्यात रात्रीच्या वेळी चोरून उत्खनन होत असल्याच्या तक्रारी होत्या.

महसूल विभागाने गट नंबर 410 मध्ये पूर्वी बंद असणार्‍या तीन व उर्वरीत चार अशा सात खाणी सील केल्या. त्या खाणपट्ट्यात चार क्रशर आढळून आले. शिवाय काही प्रमाणात उत्खनन झाल्याचेही निदर्शनास आले. चारही क्रशर सील करण्यात आले आहेत. गट नंबर 409 मध्ये आठ खाणी होत्या. यातील 2 पूर्वी पासून बंद आहेत. तर मुदत संपल्याने सहा खाणी महिन्यापूर्वी बंद करण्यात आल्या होत्या. तेथेही नजर चकवून व चोरी छुपे उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे तेथील सर्व आठ खाणपट्टे महसूल विभागाने सील केले. कारवाई दरम्यान तेथे आठ क्रशर आढळून आले. तेही सील करण्यात आले आहेत. काही प्रमाणात तेथे दगडखाणींचे उत्खनन झाल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले आहे.

भविष्यात या ठिकाणी बेकायदा व चोरून उत्खनन होवू नये, म्हणून खाणींना चुना लावण्यात आला आहे. शिवाय खाणींकडे जाणारे सर्व रस्ते मोठी चर काढून अडविण्यात आले आहेत. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या सूचनेनुसार प्रभारी तहसीलदार देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूरचे मंडलाधिकारी पी.डी.पाटील, नांदलापूरचे तलाठी सुजीत थोरात, जखिणवाडीचे तलाठी हणमंत चौधरी, मलकापूरचे तलाठी दीपक काणकेकर, येरवळेचे तलाठी म्हारू राऊत, आटकेचे तलाठी आर.बी.पाटील यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT