सातारा

वावर हाय तर पावर हाय! म्हसवडातील 1800 शेतक-यांना मिळणार 'ऊर्जा'!

Balkrishna Madhale

सातारा : 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' योजनेतून म्हसवड (ता. माण) येथे साकारलेल्या साडेसहा मेगावॅटच्या सौरप्रकल्पातून १२ गावांतील १८०० शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे निमित्त साधून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील ५० कृषीवाहिन्या सौर ऊर्जेवर सुरु करण्याचे निर्देश दिले होते. या ५० मध्ये महावितरणच्या बारामती परिमंडलातील वडूज विभागांतर्गत येणाऱ्या म्हसवड उपकेंद्रातील तीन वाहिन्यांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास असा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा केला जातो. रात्री-अपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' ही योजना हाती घेतली आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांपासून जवळ शासकीय अथवा खासगी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. अशा जागा उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री तथा सहकार व पणन मंत्री शामराव पाटील यांना सहकार्य करण्याचे व त्या भागातील किमान ८० टक्के शेतकऱ्यांना चालू बिले भरण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. 

म्हसवड येथे उभारलेला सौर प्रकल्प महापारेषण कंपनीच्या जागेवर असून, त्याची स्थापित क्षमता ६.५ मेगावॅट इतकी आहे. या सौर प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणच्या म्हसवड उपकेंद्रातून बाहेर पडण्या-या देवापूर, धुळदेव व खडकी-भाटकीया तीन कृषी वाहिन्यांना दिवसा मिळणार आहे. देवापूर वाहिनीवर म्हसवड, देवापूर, पळसावडे, विरकरवाडी, बनगरवाडी, शिरताव गावातील ६०० कृषीपंप आहेत. त्यांना सकाळी ६ ते दुपारी २ यावेळेत वीजपुरवठा होईल. तसेच धुळदेव वाहिनीवरील धुळदेवसह हिंगोली व ढोकमोड गावातील ७०० कृषीपंपांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज मिळेल. 

तर खडकी-भाटकीवाहिनीवरील खडकी, भाटकी व मासाळवाडी या गावातील ५०० कृषीपंपांना यापुढे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा मिळणार आहे. परिणामी, या १२ गावांतील शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागणार नाही. हा प्रकल्प वेळेत उभारण्यासाठी महावितरण पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सातारचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांच्यासह महावितरण व महापारेषणच्य अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT