221 Crore 51 Lakhs Fund from Govt for karad airport development satara Sakal
सातारा

Satara News : कऱ्हाड विमानतळ विकासासाठी शासनाकडून २२१ कोटी ५१ लाखांचा निधी

कऱ्हाड हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे.

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कऱ्हाड हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठिकाणे कऱ्हाड परिसरात उपलब्ध आहेत. या परिसरातील पर्यटन वाढीसाठी कऱ्हाड विमानतळचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे.

त्या कामांसाठी सुधारीत प्रशासकीय वित्तीय मान्यतेअंतर्गत २२१ कोटी ५१ लाखांच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असा अद्यादेश राज्य शासनाच्या अव्वर सचिव राजश्री हिर्लेकर यांनी जारी केला आहे. त्यामुळे कऱ्हाडच्या विमानतळ विस्तारवाढीसह विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण व्हावे यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना येथील विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास कामांसाठी शासनाने २८ ऑगस्ट २०१२ अन्वये प्रशासकीय मान्यता दिली होती.

त्यावेळी ९५ कोटी ६४ लाखांच्या खर्चास वित्तीय मान्यता दिली होती. त्यानंतर श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या परिसरातील शेतकऱ्यांनी विस्तारवाढीला विरोध केला होता.

त्यामध्ये मधला ११ वर्षांचा काळ गेला. दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठिकाणे कऱ्हाड परिसरात उपलब्ध आहेत. या परिसरातील पर्यटन वाढीसाठी कऱ्हाड विमानतळचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे.

त्या कामांसाठी सुधारीत प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी २२१ कोटी ५१ लाखांच्या खर्चाचा सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनाकडे सादर केला होता.

तो प्रस्ताव मुख्य सचीवांच्या अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्या समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कऱ्हाड विमानतळ विकासासाठी शासनाकडून २२१ कोटी ५१ लाखांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे, असे शासनाच्या अव्वर सचीव राजश्री हिर्लेकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हंटले आहे.

खर्चाची तरतुद अशी

  • सुमारे 45.82 हेक्टर अतिरीक्त जमिन संपादन,

  • प्रांत कार्यालय अस्थापना खर्च, प्रकल्पबाधीत घरांची किंमत - 89 कोटी 71 लाख

  • प्रकल्पबाधित घरांचे पुनर्वसन जागी सुविधांसाठी खर्च - सात कोटी १२ लाख

  • प्रकल्प बाधितांच्या कॉलनीसाठी खर्च - 20 कोटी

  • बाधित शेतक-याच्या पुनर्वसन पॅकेजसाठी - 11 कोटी 53 लाख

  • टर्मिनस बिल्डींग, एटीसीटॉवर, फायर यंत्रणा खर्च - 10 कोटी 91 लाख

  • धावपट्टीचे काम, ॲप्रन, नेव्हीगेशन, कम्युनिकेशन सिस्टीम - 29 कोटी 73 लाख

  • जमिनीचे सपाटीकरण, संरक्षक भिंत, पावसाळी नाल्याची निर्मीती ः 14 कोटी 59 लाख

  • भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाइनचे स्थलांतर खर्च - आठ कोटी 50 लाख

  • प्रकल्प सल्लागार शुल्क, इतर नियामक मंडळांची मंजूरी खर्च - एक कोटी 26 लाख

  • महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा प्रशासकीय, आस्थापना खर्च - आठ कोटी चार लाख

  • प्रकल्प खचात 10 टक्के वाढ धरुन होमारी रक्कम ः 20 कोटी 12 लाख

निधीसाठी पृथ्वीराज चव्हाणांचा पाठपुरावा

पावसाळी अधिवेशनात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारीकरणांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यांनी महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कऱ्हाडला जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केले.

कऱ्हाड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. विमानतळ विस्तारिकरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला देण्याची आवश्यकता असल्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकऱ्यांच्या काही अडचणी नसतील तर निधीची कोणतीही कमी होणार नाही.

कऱ्हाडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे. त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो असे सांगीतले होते. त्यानुसार संबंधित निधी मंजुर झाल्याचे आमदार चव्हाण यांच्या कार्यालयाकडुन कळवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 20th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता; लाभार्थी यादी कशी तपासाल?

आगरकर, गंभीरला चालत असेल, पण...! Jasprit Bumrahच्या 'वर्कलोड' वरून दिग्गज खेळाडूचा संताप; असे चोचले...

Monsoon Skincare: दुपारी कामानंतर लावा 'हा' फेस पॅक, मिळवा चेहर्‍यावर नैसर्गिक चमक

Latest Marathi News Updates : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी प्रकाश दादा जगताप यांची निवड

Sarpanch Election : कोल्हापुरात लोकनियुक्त सरपंचांना हटवण्यासाठी संपूर्ण गावाने मतदान केलं, अन् अविश्वास ठराव आणला; नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT