25 accident sites on national highways Survey of black spots by highway police satara 
सातारा

राष्ट्रीय महामार्गावर २५ अपघात स्थळे

महामार्ग पोलिसांकडून ब्लॅक स्पॉटचा सर्व्हे; साताऱ्यासह सांगली, कोल्हापुरातील ३० हून अधिक गावांचा समावेश

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड - पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत २५ ठिकाणे अपघातग्रस्त झाली आहेत. महामार्ग पोलिस विभागाने त्या ब्लॅक स्पॉटची पाहणी केली. शेंद्रे ते पेठनाका ते किणी टोलनाका दरम्यान ३० हून अधिक गावांत २५ पेक्षाही जास्त ब्लॅक स्पॉट असल्याने वर्षभरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत १२५ हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्या अपघातात १०० वर नागरिकांना कायमची दुखापत झाली. मात्र, ब्लॅक स्पॉटवर कायमच्या उपाययोजना करण्याची मागणी महामार्ग पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. त्यासंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडून उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह देखभाल-दुरुस्ती विभागही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यातील शेंद्रेपासून सांगली जिल्ह्यातील पेठनाका ते कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाक्यापर्यंतचा प्रवास धोक्याचा ठरतो आहे. त्या टप्प्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक सहा तर इस्लामपूर व सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वांत कमी केवळ प्रत्येकी एक ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे. त्यापाठोपाठ उंब्रजला पाच, कऱ्हाड शहर, तालुका, कासेगाव या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी तीन ब्लॅक स्पॉट आहेत.

महामार्ग पोलिसांचा आराखडाही हायवे ऑथॉरिटी दुर्लक्षित करत असल्याने तेथे उपाय राबविले नाहीत. महामार्गावरील दुरुस्ती कामांमुळे सर्वाधिक अपघात झाल्याची नोंद आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा स्पष्ट होतो. काम सुरू असताना चुकीचे फलक लावणे, वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्याचे निर्देश असताना त्याचे पालन केले गेलेले नाही. त्यामुळेही अपघात वाढले आहेत. महामार्गावरील पट्ट्यात २२ हून अधिक गावांत उड्डाणपूल आहेत. मात्र, तेथेही खबरदारी घेतलेली नाही.

महामार्गावर खड्डे आहेत. त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानेही तब्बल २५ अपघात झाले आहेत. मोऱ्या स्वच्छ न केल्याने तेथे कचरा अडकून सेवारस्त्यावर पाणी साचत आहे. किणी टोलनाक्यापर्यंतच्या पट्ट्यात तब्बल ४५ हून अधिक ठिकाणी पाणी साचते आहे. एकाही ठिकाणी उपाययोजना झालेली नाही. किणी व तासवडे टोलनाक्यावर दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन करण्याची सूचना करूनही त्याचे पालन केले नाही. पर्यायाने सरासरी दिवसाआड एका दुचाकीचा तेथे अपघात होतो आहे. महामार्गाच्या या पट्ट्यात ट्रक, वाहन थांबा नाही. त्यामुळे चालक झोपू शकत नाहीत. पर्यायाने वाहनांचे अपघात होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT