Coronavirus esakal
सातारा

चिंताजनक! कऱ्हाडात 25 गावं 'हॉटस्पॉट'; तालुक्‍यात 154 गावांना 'कोरोना'चा विळखा

कऱ्हाड तालुक्‍यातील तब्बल 25 गावे कोरोनाची 'हॉटस्पॉट' आहेत.

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड तालुक्‍यातील (Karad Taluka) तब्बल 25 गावे कोरोनाची 'हॉटस्पॉट' (Coronavirus Hotspot) आहेत. त्यातील आठ गावांत 40 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. तालुक्‍यातील 11 पैकी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आजअखेरच्या बाधितांत एक हजाराचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग (Health Department) अद्यापही सतर्कच आहे. कोरोनाचे 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेली गावे शासनाने 'हॉटस्पॉट' म्हणून जाहीर केली आहेत. त्यात तालुक्‍यातील 25 गावांचा समावेश आहे. तालुक्‍यात कोरोनाने आजअखेर तब्बल 444 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (25 Villages In Karad Taluka Are The Hotspot Of Coronavirus Satara News)

तालुक्‍यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यापैकी सहा आरोग्य केंद्रांनी आजअखेरच्या टप्प्यात एक हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. वडगाव हवेली (1,600), सदाशिवगड (2,146), काले (3,164), उंब्रज (1,134), मसूर (1,245), येवती (1,011) या प्राथमिक आरोग्य केंद्रांत आजअखेरच्या टप्प्यात कोरोनाच्या एक हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. त्यांचा बरे होण्याचा टक्का चांगला आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरासरी 75 टक्के रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तालुक्‍यात 444 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 77, तर हेळगावला सर्वांत कमी केवळ नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतील स्थिती : अनुक्रमे आरोग्य केंद्र व कंसात मृत्यूचा आकडा- सदाशिवगड (39), वडगाव हवेली (37), रेठरे बुद्रुक, मसूर व येवती (प्रत्येकी 34), इंदोली (31), उंब्रज (29), कोळे (26), सुपने (23). तालुक्‍यातील हजारमाची, विरवडे, सैदापूर, पार्ले, सुपने, मसूर व बनवडी आदी गावांमध्ये 40 पेक्षा जास्त रुग्ण आजही ऍक्‍टिव्ह आहेत, तर 15 पेक्षा जास्त रुग्ण ऍक्‍टिव्ह असणाऱ्या गावांची संख्या 28 आहे. त्या गावांमध्ये घरोघरी चाचणीवर आरोग्य विभागाने भर दिला आहे. तालुक्‍यातील 154 गावांना कोरोनाचा विळखा आजही कायम आहे.

'हॉटस्पॉट' गावे व रुग्णसंख्या

हजारमाची (63), विरवडे (63), सैदापूर (52), मसूर (48), पार्ले (41), सुपने (41), बनवडी (40), वाघेरी (36), शेरे (28), कापील (25), तळबीड (23), कोपर्डे हवेली (22), गोळेश्वर (21), काले (20), कार्वे-कोरेगाव (20), सयापूर (20), कार्वे (19), गोवारे (19), टेंभू (19), वारुंजी (19), दुशेरे (18), मुंढे (18), रेठरे बुद्रुक (18), कासारशिरंबे (18), शेवाळेवाडी (17).

Tauktae Live कऱ्हाड, पाटणला घरांची पडझड; महावितरणलाही फटका

25 Villages In Karad Taluka Are The Hotspot Of Coronavirus Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT