सातारा

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी साताऱ्यातून 4372 विद्यार्थी; 900 विद्यार्थ्यांत वाढ

प्रशांत घाडगे

सातारा : राष्ट्रीय प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षा (एनटीएस) 13 डिसेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 4 हजार 372 विद्यार्थी बसणार असून, मागील वर्षीपेक्षा यंदा 900 विद्यार्थ्यांची वाढ झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. 

यंदा कोरोनाचे संकट असूनही राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. या परीक्षेसाठी जावळी तालुक्‍यातून 146 विद्यार्थी, कऱ्हाड 765, खंडाळा 186, खटाव 428, कोरेगाव 403, माण 347, महाबळेश्वर 219, पाटण 416, फलटण 281, सातारा 828, वाई 326 असे एकूण 4372 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, तसेच या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि वाणिज्य यामधील पीएचडी पदवी प्राप्त करेपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. प्रत्येक शिष्यवृत्तीधारकास शालांत परीक्षेनंतर अकरावी, बारावीसाठी दरमहा 1250 रुपये, सर्व शाखांच्या प्रथम पदवीपर्यंत 2000 रुपये, सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत दरमहा 2000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येबरोबर शाळांचा सहभागही वाढला आहे. या परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्‍यात परीक्षा केंद्र देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय स्तरावर पात्र ठरल्यास पीएचडीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणारी ही महत्त्वपूर्ण योजना आहे. 
- राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT