Katreshwar Temple Katarkhatav esakal
सातारा

कात्रेश्वराच्या पुनर्निर्माणामुळे तब्बल 900 वर्षे जुना इतिहास उजेडात; चालुक्य-यादव काळातील सापडली मातीची भांडी

माण-खटाव तालुक्यातील आकाराने सर्वांत मोठ्या असलेल्या बारवेचे मंदिर अशी ओळख कात्रेश्वर मंदिराची आहे.

रूपेश कदम

इतिहासात देवगिरीचा राजा सिंघणदेव यादव यांनी बरेच वर्षे माणदेशात राहून शिखर शिंगणापूरची निर्मिती केली व त्याच काळात परिसरात अनेक शिवमंदिरे बांधण्यात आली.

दहिवडी : चालुक्य व यादव काळातील ऐतिहासिक ठेवा म्हणजे कातरखटावचे कात्रेश्वर मंदिर (Katreshwar Temple Katarkhatav). या मंदिराचे पुनर्निर्माणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. हे काम सुरू असताना ८०० ते ९०० वर्षे जुनी मातीची भांडी आढळून आली आहेत. यात प्रामुख्याने आकाराने लहान‌मोठी असलेली मडकी आहेत. गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या भिंतीत सापडलेली मातीची भांडी संशोधनाचा विषय बनला असून, परिसरात या ऐतिहासिक वस्तूंबद्दल उत्सुकता वाढली आहे.

माण-खटाव तालुक्यातील आकाराने सर्वांत मोठ्या असलेल्या बारवेचे मंदिर अशी ओळख कात्रेश्वर मंदिराची आहे. कात्रेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागांतर्गत (Archaeology Department) सुरू असून, मंदिराची पुनर्रचना करण्यासाठी मंदिराचे उत्खनन करून त्याचा पाया, त्याची रचना, पूर्वी जशा प्रकारे होती त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

यासाठी पडझ‌ड झालेल्या मंदिराच्या प्रत्येक दगडांवर क्रमांक नोंदवून त्याचे नकाशे, रेखाचित्र छायाचित्र तयार करून संग्रहित करण्यात येत आहे, तसेच मंदिरावरील हजारो टनाचे दगड क्रेनच्या साह्याने क्रमाने परिसरात पुन्हा पुनर्बांधणीसाठी मांडून ठेवले जात आहेत. जे दगड सुस्थितीत आहेत, त्या दगडांना मुलामित करून ते पुन्हा वापरले जाणार आहेत आणि जे दगड जीर्ण अथवा मोडतोड झालेत ते काढून त्याच प्रकारे नवीन घडवून बसवण्यात येणार आहेत.

इतिहासात देवगिरीचा राजा सिंघणदेव यादव यांनी बरेच वर्षे माणदेशात राहून शिखर शिंगणापूरची निर्मिती केली व त्याच काळात परिसरात अनेक शिवमंदिरे बांधण्यात आली. कात्रेश्वर मंदिराची रचनासुद्धा यादवकाळातील वास्तुशैलीतील आहे. यादव काळाची साक्ष असलेली मंदिर परिसरातील पाण्याची बारव पडझडीच्या अवस्थेत आहे. मंदिर पुनर्निर्माणानंतर त्या बारवेचीही दुरुस्ती करण्याची गरज आहे. या मंदिर पुनर्निर्माण कार्यात ज्या पुरातन वस्तू सापडतील त्या ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन करून ठेवल्या जाणार आहेत.

कात्रेश्वर मंदिर हे जीर्णोद्धार व संवर्धनाचा सर्वोत्तम नमुना बनेल. मंदिराचे पुनर्निर्माण झाल्यानंतर हे मंदिर अतिशय विलोभनीय व सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल.

-हर्षवर्धन गोडसे, मंदिर कार्याचे पुरातन वास्तू संवर्धन विशारद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात निवडायला हवं! दिग्गज खेळाडूची मागणी; म्हणाले, तो मॅच्युअर नाही असं...

Pune News : पुणे शहराला विषाणूजन्य आजारांचा विळखा; ‘एच १ एन १’ सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ

Deglur Rain : देगलूरात ढगफुटीसदृश्य पाण्याने हाहाकार; अनेक गावे जलमय शेती ही पाण्याखाली, २५ गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Live Updates : सांताक्रूझमधील अकोला पोलीस स्टेशन परिसरात साचलं पाणी

CP Radhakrishnan Meet PM Modi: ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT