annasaheb patil sakal
सातारा

90th Birth Anniversary : 'तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही..' माथाडींचे झुंजार नेतृत्व कै. अण्णासाहेब पाटील

माथाडी कामगार आणि कष्टकऱ्यांचे आराध्यदैवत (कै.) आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९० वी जयंती आज (सोमवारी) विविध उपक्रमांनी साजरी होत आहे.त्यानिमित्त,पोपटराव देशमुख (जनसंपर्क अधिकारी)

सकाळ वृत्तसेवा

पिळदार मिशा आणि मजबूत शरीरयष्टीचे अण्णासाहेब पाटील कष्टकऱ्यांचे दैवत आणि मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढलेले लढवय्ये नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे या छोट्याशा गावात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अण्णासाहेबांना त्यांच्या मातोश्रींनी उपजतच परिश्रमाचे बाळकडू पाजले होते. कमी शिक्षणामुळे मेहनतीच्या कामाशिवाय पर्याय नसल्याने सुरुवातीला त्यांनी मुंबईत उसाच्या घाण्यावर काम केले.

त्यानंतर लाकडाच्या वखारीत मजूर म्हणून नोकरी पत्करली. त्याकाळी कामगारांची मालकांकडून होणारी पिळवणूक सहन न झाल्याने साताऱ्याच्या मातीतल्या या धाडसी नेतृत्वाने कष्टकऱ्यांच्या मनामनात आपल्या हक्कांसाठी अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रज्वलित केलेली ठिणगी पुढे मशाल बनली. तिच्या तेजात तमाम कष्टकऱ्यांचे जीवन उजळून निघाले.

अण्णासाहेब पाटील माथाडी कायदा व माथाडी मंडळाची स्थापना एवढेच करून थांबले नाहीत, तर माथाडी कामगारांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त व्हावे, अडीअडचणीच्या काळात संघटनेच्या माध्यमातून माथाडी कामगारांना मदत मिळावी, यासाठी त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांचा दूरदृष्टीने विचार करून माथाडी भवन, माथाडी पतपेढी

नवी मुंबई येथे माथाडी हॉस्पिटल, माथाडी ग्राहक सोसायटी या संस्थांची स्थापना केली. सिडकोमार्फत माथाडी कामगारांना घरे मिळवून दिली. माथाडी कामगारांच्या मुलांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून पतपेढीच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक योजनासुद्धा राबविल्या. अण्णासाहेब पाटील हे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि कष्टकरी माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढले. १९८० मध्ये मराठा महासंघाची स्थापना केली. आर्थिक निकषावर आरक्षणासाठी २२ मार्च १९८२ रोजी त्यांनी मोर्चा काढला होता.

मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही, असे त्यावेळी ठणकावून सांगणाऱ्या अण्णासाहेबांनी दुसऱ्या दिवशी पहाटे स्वतःचे जीवन संपवले. संपूर्ण महाराष्ट्र अण्णासाहेबांचे कार्य जाणतो. अण्णासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या संघटनेचे अस्तित्व उत्तरोत्तर कायम राहावे व ती अधिक बळकट करण्यासाठी त्यांचे सुपुत्र (कै.) शिवाजीराव पाटील व (कै.) संभाजीराव पाटील यांनी अथक प्रयत्न केले. संघटनेला अधिक बळकट केले.

शिवाजीराव पाटील व संभाजीराव पाटील यांच्या अकाली निधनानंतर अण्णासाहेबांचे चिरंजीव संघटनेचे सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र पाटील तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप व अन्य नेते मंडळी अण्णासाहेबांची संघटना अधिक बलाढ्य करण्यासाठी झटत आहेत. अण्णासाहेब पाटील यांचे कार्य आणि त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी संघटितपणे पुढे नेणे, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT