Booster Dose esakal
सातारा

सातारा जिल्ह्यात बूस्टर डोससाठी ९२ केंद्रे

१८ वर्षे वयोगटापासून सर्वांना मिळणार विनामूल्य

प्रशांत घाडगे

सातारा - भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात १८ वर्षांपुढील व्यक्तींना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय अशा ९२ केंद्रांत बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. याचबरोबर जिल्ह्यात एकूण दीड लाख बूस्टर डोस उपलब्ध असल्याने लसीकरण सुरळीत सुरू असल्याचे दिसून येते.

मार्च २०२० पासून जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. त्यानंतर कोरोनाला रोखण्यासाठी तब्बल दीड वर्षानंतर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले. डिसेंबर २०२१ मध्ये कोरोनाच्या तिसरी लाट आली. परंतु, लसीकरणामुळे गृहविलगीकरणात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर बूस्टर डोस देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी व ६० वयोगटापुढील ज्येष्ठांना केवळ सरकारी रुग्णालयात मोफत डोस होता. तर, खासगी रुग्णालयांत पैसे देऊन बूस्टर डोस मिळत होता.

जून व जुलै महिन्यांत तर जिल्ह्यात एकाही खासगी रुग्णालयात बूस्टर डोस मिळत नसल्याने नागरिकांना मुंबई, पुणे व परजिल्ह्यात लसीकरणासाठी जावे लागत होते. परंतु, केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात निर्णय घेऊन पुढील ७५ दिवस सर्व आरोय केंद्रांमध्ये १८ वयोगटापुढील व्यक्तींना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविशिल्डचे एकूण ७० हजार तर कोव्हॅक्सिनचे ८० हजार डोस शिल्लक आहेत. दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या अधिक असल्याने बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यासाठी आठ लाख बूस्टर डोसची मागणी केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

जिल्हा रुग्णालयातच ऑनलाइन बुकिंग

जिल्ह्यात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांत बूस्टर डोस मिळत आहे. यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्याची आवश्‍यकता नाही. परंतु, केवळ साताऱ्यात जिल्हा रुग्णालयात (सिव्‍हिल) होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन त्या ठिकाणी बुकिंगचे स्लॉट ठेवले आहेत.

...यांना मिळेल बूस्टर डोस

जिल्ह्यात दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या ९५ टक्के आहे. सुरुवातीला दुसरी लस घेतल्यानंतर नऊ महिन्यांनी बूस्टर डोस देण्याचे आरोग्य विभागाचे निर्देश होते. मात्र, आता दुसऱ्या लसीनंतर सहा महिने अथवा २६ आठवड्यानंतर बूस्टर डोस मिळणार आहे. नागरिकांनी आधार कार्ड, दोन्ही लस घेताना नोंदणी असणारा मोबाईल क्रमांक असणे आवश्‍यक आहे.

जिल्ह्यात बूस्टर डोस देण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये नियोजन केले आहे. ज्या नागरिकांचा दुसरा डोस घेऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, असे बूस्टर डोससाठी पात्र आहेत. तसेच जिल्ह्यासाठी बूस्टर डोस अधिक मिळण्याबाबत मागणी केली आहे.

- डॉ. प्रमोद शिर्के, नोडल अधिकारी, लसीकरण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

SCROLL FOR NEXT