रस्त्यावरील दलदलीत घसरून अपघाताच्या घटना रोजच घडत आहेत.
रस्त्यावरील दलदलीत घसरून अपघाताच्या घटना रोजच घडत आहेत. Sakal
सातारा

सातारा : निसरड्या रस्त्यामुळे अपघातांची मालिका

फिरोज तांबोळी

गोंदवले - अवघ्या काही मीटर अंतराच्या रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे गोंदवल्यात चार दिवसांत दुचाकींचे तब्बल तीसहून अधिक अपघात झाले आहेत. सातारा- लातूर महामार्गाच्या कामासाठी खोदकाम केलेल्या रस्त्यावर चिखलामुळे रपा रप वाहने घसरत असल्याने अपघातांची मालिकाच सुरू आहे. या कामाला कोणी वाली आहे का, किती अपघात झाल्यावर रस्त्याचे काम पूर्ण होणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

सातारा- लातूर महामार्गाचे काम गोंदवल्यात गेल्या दोन वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरापासून पुढच्या भागातील मुख्य चौकात हे काम ठप्प झालेय. अण्णा भाऊ साठे चौक ते आप्पा महाराज चौक या काही मीटरच्या अंतरात रेंगाळलेल्या रस्त्याने प्रवाशांसह नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतोय. या कामाबद्दल प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु अनेक महिने उलटल्यानंतरही काम जैसे- थे अवस्थेतच आहे. अण्णा भाऊ साठे चौकापासून वैभव चौकापर्यंत एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काम ठप्प झाले.

या रेंगाळलेल्या कामामुळे लोकांना धुळीचा त्रास सोसावा लागतोय. त्यावर उपाययोजना म्हणून उखडलेल्या रस्त्यावर संबंधितांकडून पाणी मारण्यात येतेय; परंतु याचाही विपरित परिणाम सध्या पाहायला मिळतोय. चिखलामुळे या रस्त्यावर दुचाकी घसरण्याच्या घटना नित्याच्याच झाल्यात. दुचाकीस्वारांसह वृद्ध, महिला व बालके मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्त होत आहेत. गेल्या चार दिवसांत या रस्त्यावर तीसहून अधिक दुचाकी घसरून अपघात झाले आहेत. यापूर्वीही रस्त्यावर घसरून एकाला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी प्रशासन आणखी किती जीव जाण्याची वाट पाहतेय, या अपघातांमुळे होणाऱ्या आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT