Crime News esakal
सातारा

घरात टीव्ही पाहत असताना वाईच्या युवकावर भुईंजमध्ये खुनी हल्ला

विलास साळुंखे

भुईंज (सातारा) : असले हद्दीत महामार्गाशेजारी वाहनांच्या पाटा कमानीचे कामा करणाऱ्या युवकावर घरात टीव्ही पाहत असताना अज्ञात तीन जणांनी धारदार शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. तिघेही अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाले आहेत. अझर जब्बार इनामदार (Azhar Inamdar) (वय ४३, रा. वाई) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. (A Youth From Wai Was Attacked By Three Person In Bhuinj Satara Crime News)

अझर याने लाकडी दांडके हल्लेखोराच्या हातातून घेऊन त्याच्याच डोक्यात मारले. त्यावेळी दुसऱ्या एकाने धारदार शस्त्राने अझरच्या पोटात वार केला.

याबाबत दुकान जागामालक हणमंत किसन कणसे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भुईंजनजीक कृष्णा नदीच्या पुलानजीक महामार्गावर हणमंत कणसे यांची जागा असून या जागेत वाई येथील अझर जब्बार इनामदार हे वाहनांच्या पाटा कमानीचे काम करण्याचे दुकान भाडेतत्त्‍वावर चालवत होते. काल सायंकाळी साडेनऊ वाजता ते आपल्या मोटारीतून वाईहून कृष्णा पुलावर (Krishna Bridge) आले होते. हणमंत किसन कणसे, त्यांची मुलगी व अझर हे रात्री बारा वाजेपर्यंत टीव्ही पाहत होते. त्यावेळी अचानक तीन जण मास्क घालून तेथे आले व त्यांनी अझर यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला चढविला.

त्यावेळी अझर याने लाकडी दांडके हल्लेखोराच्या हातातून घेऊन त्याच्याच डोक्यात मारले. त्यावेळी दुसऱ्या एकाने धारदार शस्त्राने अझरच्या पोटात वार केला. त्यामुळे अझर गंभीर झाला हे पाहून तिघे हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर हणमंत कणसे व त्यांच्या मुलीने अझरला वाई येथील मिशन हॉस्‍पिटला (Wai Mission Hospital) उपचारासाठी नेले. तेथून अझरच्या घरच्यांनी सातारा येथील खासगी रुग्णालयात (Private hospital) दाखल केले आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात (Wai Police Station) झाली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अशिष कांबळे, रत्नदीप भंडारे, श्री मोरे करीत आहेत.

A Youth From Wai Was Attacked By Three Person In Bhuinj Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT