सातारा

भारतीय कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर

विलास साळूंखे

भुईंज (जि.सातारा) : सांगोला (जि. सोलापूर) तालुक्‍याचे भाग्यविधाते माजी मंत्री व भारतीय कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाचा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार आणि रूरल फाउंडेशनचे प्रदीप लोखंडे यांना पाचवा आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्कारार्थींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
 
भोसले म्हणाले, की कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या 23 वर्षांपासून आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे 24 वे वर्ष आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत समाजहिताचे कार्य अखंडपणे करीत युवा पिढीला प्रेरक ठरणाऱ्या, तसेच जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचाही सन्मान व्हावा, या उद्देशाने आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून, 51 हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक भावनेतून त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना किसन वीर व्यवस्थापनास मनस्वी आनंद असल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.

गुड न्यूज...महाबळेश्वरात एकाचवेळी 328 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती!

आयुष्यात कितीही अडथळे आले, तरी हार मानू नका; यूपीएससीत बेंदवाडीचा वैभव हिरवेचा झेंडा 

या निवडीसाठी करण्यात आलेल्या समितीने यंदाच्या चोविसाव्या पुरस्कारासाठी गणपतराव देशमुख यांच्या नावाची आणि पाचव्या प्रेरणा पुरस्कारासाठी प्रदीप लोखंडे यांनी एकमताने केलेली शिफारस संचालक मंडळाच्या बैठकीतही एकमताने स्वीकारण्यात आल्याचेही भोसले यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे दोन्ही पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम होणार नसून पुरस्कारार्थीना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. 

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

२ वर्ष चांगली चालली अन् वाहिनीने अचानक बंद केली लोकप्रिय मालिका; प्रेक्षक संतापले, म्हणतात- काय मूर्खपणा...

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Nepalese Jhol Momo Recipe: झणझणीत, आंबट आणि शेंगदाण्याच्या चवीचे, नेपाळचे खास झोल मोमो एकदा नक्की ट्राय करा

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT