accident at Khambatki Ghat Pune Satara road Accident traffic Update Marathi news  
सातारा

Pune-Satara Highway : खंबाटकी खाटात ट्रकचा विचित्र अपघात! पुणे-सातारा महामार्गावरील ट्राफिक झालं ब्लॉक

Pune-Satara Highway Accident : हा अपघात आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.

अशपाक पटेल

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावर एक विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील खंबाटकी घाट उतरल्यानंतर सातारा बाजूकडे असणाऱ्या वेळे (ता. वाई) गावाच्या हद्दीत असण्याऱ्या घाट उताराच्या तीव्र वळणावर भर पावसात एक कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. यामुळे काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

याबाबत माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाट उतरल्यानंतर वेळे गावाच्या हद्दीत पावसाच्या निसरड्या रस्त्यावर कंटेनर (गाडी क्रमांक एमएच ०९ . एफएल ११०५) या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जागेवरच उलटा फिरला. यावेळी कंटेनरचे तोंड विरुद्ध बाजूला झाले. सुदैवाने या अपघातात चालक थोडक्यात बचावला. तसेच इतरही वाहनांचा अपघात घडला नाही. यावेळी रस्त्यावर वाहनांची संख्या तुरळक असल्याने मोठा अनर्थ टाळला.

हा अपघात आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT