khambatki ghat accident today esakal
सातारा

खंबाटकी घाटाजवळील 'S कॉर्नर'वर 6 गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक

अशपाक पटेल

खंबाटकी घाटाजवळील एस कॉर्नरवर सहा गाड्यांचा अपघात झाल्याचं समजतंय.

खंडाळा : खंडाळा (सातारा) : पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) नेहमी अपघात घडणाऱ्या एस आकाराच्या तीव्र वळणावर आज सायंकाळी पाच वाजता भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरी एकमेकावर आदळल्याने एकूण सहा गाड्यांचा विचित्र अपघात झाला.

घटनास्थळ व पोलिसांनी (Khandala Police) दिलेल्या माहितीवरुन, खंबाटकी घाट उतरल्यानंतर महामार्गावर पुढील चालणाऱ्या लक्झरीला (गाडी क्रमांक एमएच 09 सीएन 9207) पाठीमागून आलेल्या लक्झरीने (गाडी क्रमांक एमएच 46 बीबी 9566) ठोकरले. यावेळी रस्त्यावर लक्झरी गाडी अचानक आडवी झाली. अचानक गाडी महामार्गावरच आडवी झाल्याने पाठीमागून येणारी दोन कार (गाडी क्रमांक एमएच 12 LJ 3643), बुलेरो (गाडी क्रमांक एमएच 12 ईएफ 5066) व दुचाकी (गाडी क्रमांक एमएच 09 सीएफ 5047) एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झाला.

यामध्ये गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी नाही. खंडाळा पोलीस विठ्ठल पवार, फरांदे, भोईटे व पिसाळ तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वाहनांना तत्काळ बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त गाड्या पोलीस स्टेशनला नेहून लावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT