सातारा

गडकोट संवर्धनासाठी निघालेल्या युवकाचा अपघातात मृत्यू

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : गडकोट संवर्धनासाठी पुण्याहून मुंबईघ्या दिशेने निघालेल्या पाटण तालुक्यातील नाटोशी (वरेकरवाडी ) येथील राहुल सुरेश वरेकर (वय 25) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला. लोणावळा चौकात झालेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या धडकेत वरेकर हा दुचाकीस्वारचा जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी पहाटे झाला.

या घटनेबाबतची माहिती गावातील ग्रामस्थ डॉ. प्रकाश वरेकर यांनी दिली. राहुल सुरेश वरेकर हा तरूण गडकोट संवर्धनसाठी पुणेहून मुंबईच्या दिशेने निघाल होता. लोणावळ चौकात दुचाकी क्रमांक (एम. एच. ५० k 5902) आणि चारचाकी (एम. एच.४२ एच ७५१५) झालेल्या धडकेत दुचाकीस्वार राहूल हे जागीच ठार झाला. डोक्यावर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

राहुल वरेकर यांचे एक वर्षापूर्वी लग्न झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , आई , वडील, भाऊ असा परिवार आहे. आई आणि वडील शेती करतात. मुलाच्या अपघाती जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लाखात एखादीच घटना! डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश, गर्भधारणा झालेल्या महिलेला जीवदान!

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT