Venna River esakal
सातारा

वेण्णा नदीपात्रातील बांधकामावर महाबळेश्वर पालिकेचा 'हातोडा'

पालिकेकडून साहित्यासह औजारे जप्त

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : येथे वेण्णा नदीपात्रात (Venna River) अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करीत असलेल्या एका धनिकास पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील (Chief Officer Pallavi Patil) यांनी दणका दिला आहे. पालिकेच्या (Mahabaleshwar Municipality) बांधकाम विभागाने (Construction Department) इमारतीमध्ये असलेले बांधकाम साहित्य व औजारे जप्त करून बेकायदेशीर बांधकाम न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे वेण्णा नदी पात्रात विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वेण्णालेक जवळच एका धनिकाने नदीपात्रात अतिक्रमण करून विनापरवाना बांधकाम सुरू केले आहे.

वेण्णालेक जवळच एका धनिकाने नदीपात्रात अतिक्रमण करून विनापरवाना बांधकाम सुरू केले आहे. पालिकेने वेळोवेळी विनापरवाना बांधकाम करीत असलेल्या मिळकतधारकास नोटिसा बजावल्या आहेत; परंतु पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली देऊन राजकीय वरदहस्ताच्या आधारे या धनिकाने एक एक मजला करीत इमारतीचे बांधकाम सुरू ठेवले आहे. नोटिसाला हा धनिक किंमत देत नाही हे पाहून पालिकेने या मिळकतधारकावर दोन वेळा गुन्हे दाखल केले आहेत. पालिकेचा अडथळा नको, म्हणून या मिळकत धारकाने पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश मिळविला आहे.

दरम्यान, पुन्हा या इमारतीवर चौथ्या मजल्याचे बांधकाम मिळकतधारकाने सुरू केले आहे. स्थगिती आदेश असताना या मिळकतधारकाने पुन्हा इमारत बांधकाम सुरू केल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी या मिळकतधारकावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बांधकाम विभागातील कर्मचारी संबंधित इमारतीवर पाठविले. त्या ठिकाणी काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्या ठिकाणी असलेले सर्व बांधकाम साहित्य व औजारे पालिकेच्या पथकाने जप्त करून आणले आहे. त्याचप्रमाणे बांधकाम करू नये, अशी सक्त ताकीद दिली आहे. या भागातील नदीपात्रातील अतिक्रमणांवर पालिका सरसकट कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT