Corona Patient esakal
सातारा

Coronavirus : खोटी माहिती देणाऱ्या बाधितांवर आता थेट गुन्हा; मुख्याधिकाऱ्यांचे सक्त आदेश

कोरोनाबाधित झालेल्यांकडून पालिकेच्या यंत्रणेस दिली जाणारी माहिती चुकीची निघत आहे.

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाबाधित (Coronavirus) झालेल्यांकडून पालिकेच्या यंत्रणेस दिली जाणारी माहिती चुकीची निघत आहे. त्यामुळे यंत्रणेचा वेळ व बळही वाया जात आहे. बाधिताची टेस्ट (Corona Test) केल्यानंतर जो पत्ता देतो, तो कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमध्ये चुकीचा निघत आहे. बहुतांश बाधितांकडून दिली जाणारी माहिती खोटी असल्याने मूळ काम सोडून शोधशोध करण्यात पालिकेचा वेळ वाया जात आहे. ते टाळण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्या बाधितावर कऱ्हाड पालिका थेट गुन्हा दाखल करणार आहे. हे पाऊल उचलणारी कऱ्हाड पालिका जिल्ह्यात पहिली ठरली आहे. (Action Will Be Taken Against Those Who Give False Information About Corona Patient)

शहरात कोरोनामुक्तीसाठी पालिकेने कंबर कसली आहे. अत्यावश्‍यक घरपोच सेवा, सॅनिटायझरचे काम सुरू आहे. लसीकरणालाही शिस्त लावली आहे. बाधिताच्या कॉन्टॅक्‍ट ट्रसिंगमध्येही पालिका पुढे आहे. शहरात दोन हजार 672 कोरोनाचे रुग्ण आहेत. 174 रुग्ण सध्या ऍक्‍टिव्ह आहेत. बाधितांकडून दिली जाणारी खोटी माहिती पालिकेच्या कामातील अडथळा ठरत आहे. बाधितांने दिलेली माहिती कॉन्टॅक्‍ट ट्रसिंगमध्ये चुकीची ठरत आहे. रुग्ण असतो ग्रामीण भागातील व पत्ता देतो शहरातील, अशी स्थिती आहे.

ट्रेसिंगमध्ये माहिती खोटी निघाल्याने यंत्रणा वैतागली आहे. रोज किमान दहा लोकांची माहिती खोटी निघत आहे. त्यामुळे कॉन्टॅक्‍ट ट्रसिंगच्या पथकाचा वेळ व श्रमही वाया जात आहेत. खोटी माहिती देणाऱ्या बाधितावर गुन्हा दाखल करण्याचा जालीम उपाय पालिका करणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी पुढाकार घेतला आहे. खासगी व सरकारी अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी एकच बाधित कोरोनाची टेस्ट करतो. प्रत्येक ठिकाणी पत्ता किंवा मोबाईल नंबर चुकीचा देतो. मात्र, अशांवर आता गुन्हा दाखल होणार असल्याने त्यावर नियंत्रण येणार आहे.

कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी व बाधिताचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग व्यवस्थित व्हावे, यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. मात्र, काही बाधित खोटी माहिती देत आहेत. त्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येतील.

- रमकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

Action Will Be Taken Against Those Who Give False Information About Corona Patient

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Gokul Election Heat in Kolhapur : 'गोकुळ'ची धामधूम असतानाही आलात त्याबद्दल तुमचे आभार; मंत्री मुश्रीफांकडून सतेज पाटील यांचा चिमटा

SCROLL FOR NEXT