वाई : तुम्ही अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार आहात का? या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत तुम्ही असाल तर तुम्ही प्रवेशाची पूर्वतयारी केली आहे का? होय, तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक असाल तर आतापासूनच प्रवेशाची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा कक्षातर्फे ‘सीईटी’ परीक्षा घेण्यात येते. या प्रवेश परीक्षांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर केले जातात.
दरम्यान, प्रत्यक्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व कागदपत्रे परीक्षा कक्षांच्या संबंधित संकेतस्थळावर अपलोड करावी लागतात. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यास खुल्या प्रवर्गातून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा विचार केला जातो आणि त्यानुसार प्रवेशासाठी निवड यादी जाहीर केली जाते. त्यामुळे कागदपत्रे प्राप्त करून ठेवावीत, असे आवाहन तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.
प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांकडूनच प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावीत. बनावट अथवा खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल,’’ असे राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सांगितले आहे.
पदविका : अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, वास्तूकला, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी
पदवी : अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, वास्तुशास्त्र, बी. प्लॅनिंग, बी. डिझाईन, बीबीए/बीएमएस/ बीबीएम, बीसीए.
पदव्युत्तर पदवी : एम.ई/एम.टेक, एम.फार्म, फार्म. डी, एम. आर्किटेक्चर, एम. प्लॅनिंग, एम.एचएमसीटी, एमबीए/एमएमएस, एमसीए, तसेच संलग्न एकात्मिक अभ्यासक्रम (इंटिग्रेटेड)
https://www.dte.maharashtra.gov.in
जात/जमात प्रमाणपत्र
जात/जमात वैधता प्रमाणपत्र
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र
दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.