Adv Uday Singh Patil Undalkar group wins Shyamrao Patil credit union election 
सातारा

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाचे वर्चस्व

श्यामराव पाटील पतसंस्था निवडणूक; विरोधी पॅनेलचा दारुण पराभव

सकाळ वृत्तसेवा

उंडाळे - येथील स्वातंत्रसैनिक श्यामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते विलासराव पाटील रयत पॅनेलने विरोधी पॅनेलचा दारुण पराभव केला. त्यांचे चुलते जयसिंगराव पाटील व बंधू आनंदराव ऊर्फ राजाभाऊ पाटील यांच्या श्यामराव पाटील सहकार पॅनेलला पराभवाशी सामोरे जावे लागले. श्यामराव पाटील नागरिक पतसंस्थेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच तब्बल ४२ वर्षांनी निवडणूक झाली.

अॅड. उदयसिंह यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनेल विरुद्ध जयसिंगराव पाटील व बंधू राजाभाऊ पाटील-उंडाळकर यांचे श्यामराव पाटील सहकार पॅनेल यांच्यात लढत झाली. अत्यंत चुरशीने मतदान झाले. आठ हजार ९०० पैकी सहा हजार १४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदिरात मतमोजणी पार पडली. त्यात जयसिंगराव पाटील व राजाभाऊ पाटील यांच्या पॅनेलला अवघी एक हजार ३०० मते मिळाली. तर विजयी अॅड. उदयसिंह यांच्या पॅनलने सात हजार ३०० मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

विजयी उमेदवार व कंसात त्यांना पडलेली मते : सर्वसाधारण कर्जदार गट - बळवंत पाटील (चार हजार ४८१), बाळू घराळ (चार हजार ४५४), अशोक चव्हाण (चार हजार ४४२), विठ्ठल थोरात (चार हजार ४४१), आनंदा माने (चार हजार ४३१), शहाजी शेवाळे (चार हजार ४२३), हिम्मत थोरात (चार हजार ४२०), तानाजी पाटील (चार हजार ४१६), महिला राखीव - वर्षा पाटील (चार हजार ६७१), विमल पाटील (चार हजार ६१३), अनुसूचित जाती-जमाती राखीव - राहुल यादव (चार हजार ४६९), विमुक्त जाती, भटक्या जमातीसह विशेष मागास प्रवर्ग - अशोक पोळ (चार हजार ७००), इतर मागास वर्ग - शंकर माळी (चार हजार ५७६). निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संदीप जाधव यांनी काम पाहिले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mumbai News: रेल्वेतच महिलेला प्रसुतीकळा, खाकी वर्दीतल्या देवदूताची धाव; माय लेकाचा वाचवला जीव

SCROLL FOR NEXT