Maharashtra Politics Sakal
सातारा

Maharashtra Politics : अजित दादांसोबत असलेले आमदार मकरंद पाटील शरद पवारांच्या गाडीत

Sharad Pawar Latest News : आज आमदार पाटील यांना ज्येष्‍ठ नेते शरद पवार यांच्यासोबत पाहून हे कार्यकर्ते आता नेमकी काय भूमिका घेणार ?

सकाळ वृत्तसेवा

Shirval/Satara News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर नीरा नदीच्या तीरावर शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे आज सकाळी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शरद पवार, आमदार रोहित पवार, प्रतिभाताई पवार यांच्यासमवेत आमदार मकरंद पाटील हेही असल्याचे पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या.

अजित पवार यांच्या राजकीय बंडावेळी आमदार मकरंद पाटील यांचे नाव असल्याचे सांगण्यात आल्याने आज आमदार पाटील यांना शरद पवार यांच्यासोबत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आमदार पाटील यांना अजित पवारांसोबत पाहून वाई विधानसभा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आपली भूमिकाही जाहीर केली होती.

आज आमदार पाटील यांना ज्येष्‍ठ नेते शरद पवार यांच्यासोबत पाहून हे कार्यकर्ते आता नेमकी काय भूमिका घेणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर आगमन होताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुष्पहार व जोरदार घोषणाबाजी होऊन त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, मनोज पवार, राजेंद्र तांबे, डॉ. नितीन सावंत, सरपंच रविराज दुधगावकर, उपसरपंच ताहेर काझी, हणमंतराव सांळुखे, अजय भोसले, आदेश भापकर, अमीर काझी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर खंडाळा येथेही ज्येष्ठ नेते पवार यांचे विजयराजे धमाळ व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT