सातारा

छगन भुजबळांनी सावित्रीबाईंना अभिवादन केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक; पुतळ्याचे शुद्धीकरण!

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छगन भुजबळ हे साताऱ्यातील नायगाव येथे आले आहेत. भुजबळांनी सावित्रीबाई यांना अभिवादन केल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

सातारा- सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छगन भुजबळ हे साताऱ्यातील नायगाव येथे आले आहेत. भुजबळांनी सावित्रीबाई यांना अभिवादन केल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. भुजबळांच्या अभिवादनानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली.

छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंच्या स्मारका ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी स्मारकाठिकाणी आंदोलन केले. भुजबळांनी अभिवादन करताच, मराठा कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

छगन भुजबळ, रुपालीताई चाकणकर यांनी याठिकाणी येऊन सावित्रीबाईंना अभिवादन केले आहे. ज्या मनुवादी विचाराने महात्मा फुलेंना, सावित्रीबाईंना त्रास दिला अशा लोकांसोबत हे जाऊन पद भोगत आहेत. स्वत:च्या लालसेपोटी, स्वत:चे आरोप लपवण्यासाठी ते सत्तेत गेले. अशा लोकांपासून स्मारकचं शुद्धीकरण करण्यासाठी दुग्धाभिषेक केला आहे, अशी प्रतिक्रिया एका मराठा कार्यकर्त्याने दिली.

आमचा छगन भुजबळ आणि रुपाली चाकणकर यांना विरोध आहे. स्मृती स्थळावर पवित्र ठिकाणी येऊन घोटाळा केलेले व्यक्ती याठिकाणी येतात याला आमचा विरोध आहे. मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही, पण भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना आमचा विरोध आहे. मराठा आरक्षणाशी या कृतीला जोडू नका, असं मराठा कार्यकर्त्याने म्हटलं. दरम्यान, नायगाव येथे मुख्यमंत्री शिंदें यांनी येऊन सावित्रीबाईंना अभिवादन केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT