सातारा

स्वागत कमानीचे बांधकाम पुन्हा वादात; कऱ्हाडात लोकशाही आघाडी आक्रमक

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) :  येथील शेती उत्पन्न बाजार समितीची स्वागत कमान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. डिसेंबरमध्ये कमानीचे बांधकाम सुरू असताना ती कोसळली होती. त्यानंतर त्या कमान बांधकामाच्या चौकशीचा ससेमिरा सात महिन्यांपासून मागे आहे. कमानीवरून कऱ्हाड पालिकेत घमासान सुरू आहे. केवळ कारवाईअभावी प्रशासकीय दिरंगाईने रखडलेल्या कमानीसाठी जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होणार, याची उत्सुकता आहे. 

कमानीच्या बांधकामाच्या परवानगीचा ठरावच बोगस असल्याचा लोकशाही आघाडीचा आक्षेप आहे, शिवाय कमानीच्या बांधकामाला जिल्हाधिकारी, पालिकेची मनाई असताना ते बांधकाम रेटून झाले आहे. त्यामुळे त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. बाजार समितीच्या कमानीचे बांधकाम थांबविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही बांधकाम पूर्ण झाल्याने त्या विरोधात पालिकेने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे ती कारवाई का रखडली, त्याचा जाब विचारून दोषींवर कारवाईसाठी लोकशाही आघाडी आक्रमक झाली आहे. बाजार समितीला नगरपालिकेने सात महिन्यांपूर्वी कमानीच्या बांधकामावरून गुन्हा का दाखल करू नये, अशी नोटीस दिली होती. अद्यापही त्यावर काहीच कारवाई केलेली नाही. मुळातच ती कमान बोगस ठरावाव्दारे आणल्याची भूमिका घेत लोकशाही आघाडीने त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचाही आग्रह धरला आहे. 

बाजार समितीच्या स्वागत कमानीसह केबिन बांधण्यास परवानगी देणारा ठराव बोगस आहे, पालिकेच्या मासिक बैठकीत तो झालाच नसताना इतिवृत्तात कसा आला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील यांनी फेब्रुवारीच्या बैठकीतच केली होती. मात्र, सात महिन्यांपासून प्रशासकीय दिरंगाईमुळे इतिवृत्तातील घोळ कायम आहे. त्याशिवाय गटनेते सौरभ पाटील यांच्या बाजार समितीच्या कमानीच्या विषयाकडेही कोणी गांभीर्याने पाहिलेले नाही. मात्र, अधिकाऱ्यांच्या कारभारावर झालेल्या टीका आजही चौकशीच्या कक्षेत याव्यात, असा नगरसवेकांचा आग्रह कायम आहे. 

शेती उत्पन्न बाजार समितीला कमानीचे बांधकाम थांबवावे, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला दिला होता. तरीही बाजार समितीने रेटून कमानीचे बांधकाम केले. त्या विरोधात पालिकेने गुन्हा दाखल करण्याची अंतिम नोटीस दिली होती. तरीही झालेल्या बांधकामाला जबाबदार असणाऱ्यांसह कमानीच्या बांधकामाच्या ठरावाचा अहवाल कसा झाला, त्याची सखोल चौकशी होण्याचा आग्रह आहे. 

-सौरभ पाटील, गटनेते, लोकशाही आघाडी, कऱ्हाड 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan on Epstein files : ‘मराठी माणूस पंतप्रधान होणार’ यावर पुन्हा पृथ्वीराज चव्हाणांनी केलं वक्तव्य, फुसका बार की मराठी पंतप्रधान?

'मी रक्तबंबाळ झालो, ७ वर्षांच्या लेकीला धक्का', पायलटची प्रवाशाला कुटुंबियांसमोर मारहाण

Mumbai Local Megablock: मुंबई लोकलनं प्रवास करताय? पण मेगाहाल होणार; पाहा कुठे अन् कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक?

UGC NET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तुमचा विषय कधी आहे?

Kolhapur Election : ‘सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली’; हसन मुश्रीफांनी संभाव्य आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम

SCROLL FOR NEXT