सातारा

ग्रामपंचायतीच्या अंगणात पेटवली चुल; जेवणाचा लुटला आनंद

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये शामा प्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत सवलतीची घरगुती गॅस योजना वन्यजीव विभागाने बंद केली आहे. या धोरणाच्या निषेधार्थ रासाटी येथील कुंभार कुटुंबीय व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या अंगणात नुकतेच चुलीवरचे जेवण अभिनव आंदोलन सुरू केले आहे.
 
दोन वर्षांपूर्वी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील रासाटी ग्रामपंचायतीने वन्यजीव विभागाच्या शामा प्रसाद जनवन योजनेत सहभाग घेतला. त्यापासून गावात कुऱ्हाडबंदी आहे. योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना सवलतीच्या दरात घरगुती गॅस देण्यात येत होते. यामुळे ग्रामस्थ समाधानी होते. मात्र, तीन महिन्यांपासून योजना बंद झाल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. वन्यजीव विभागाच्या सर्व अटी मान्य करूनही योजना निधीअभावी बंद आहे. जळण गोळा करण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू असली, तरी वन्यजीव विभागाने कुऱ्हाड बंदी व जाचक अटी घातल्या आहेत.
 
त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या कुंभार कुटुंबीय व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या अंगणात चुली पेटवून वन्यजीव विभागाचा निषेध सुरू केला आहे. आंदोलनात लेक लाडकी अभियानाच्या ऍड. शैला जाधव, पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, माजी सरपंच युवा नेते शैलेंद्र शेलार, आत्माराम शेलार, शिवाजी सपकाळ, रवींद्र सपकाळ, बंडू कदम, रासाटीच्या सरपंच सुरेखा कदम, उपसरपंच अश्विनी सपकाळ, विजय कुंभार, दीपक कदम, प्रकाश कदम यांनी भेट देऊन वन्यजीव विभागाचा निषेध करून चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद लुटला. वन्यजीव विभागाचे वनपाल एन. जे. तांबे यांनी आंदोलकांची भेट घेऊन कोरोना महामारीमुळे शासनाकडून अनुदान लवकर मिळाले नाही. अनुदान प्राप्त होताच योजना पूर्ववत चालू करणार असल्याचे स्पष्ट केले.

सत्ताधा-यांनी 21 एकर 15 गुंठे क्षेत्रात टाकले आरक्षण; भाजप नेत्याच्या उपस्थित शेतक-यांनी साेडले उपाेषण

सहलीहून परतल्यानंतर 33 विद्यार्थी कोरोनाबाधित? युद्धपातळीवर उपाययाेजना सुरु

कोल्हापुरात राष्ट्रवादी-कॉंग्रेसची बाजी ; शिवसेना, भाजपचीही मुसूंडी

जंगलाची काळजी घ्या; अन्यथा होणार पाच वर्षे शिक्षा, पंचवीस हजार दंड

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT