सातारा

कारखाना व्यवस्थापनाविरुध्द 'श्रीराम' कामगारांचा 'शिमगा'

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : कामगारांना ग्रॅच्युइटीची रक्कम, थकित पगार किंवा रजेचा पगार द्या, कारखाना प्रशासन व नेतेमंडळीशी कोणतेही वैर नाही. त्यामुळे आजही आमची चर्चा करण्याची तयारी आहे; परंतु कारखाना प्रशासन व नेतृत्व दखल घेणार नसेल, तर आमचीही माघार नाही. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे फलटण कृती समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम यांनी सांगितले. 

येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटीची रक्कम व थकित पगार आणि रजेचा कामगारांना पगार मिळावा, याकरता ऐन दिवाळीत फलटण कृती समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली 150 कामगारांना घेऊन साखळी उपोषण सुरू आहे. कामगारांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी उपोषणस्थळी, होळी पेटवून श्रीराम कारखाना व्यवस्थापनांच्या नावाने बोंब मारून, शिमगा आंदोलन केले. या वेळी ऍड. निकम बोलत होते. गेले आठ दिवस येथे साखळी उपोषण सुरू आहे; परंतु कारखाना व्यवस्थापन, कामगारांच्या ग्रॅच्युइटीबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे. 

आम्हाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव कारखाना प्रशासन व नेतृत्वाचा आम्ही निषेध करत असल्याचे निकम यांनी सांगितले. 2017 पासून हक्काचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत. प्रशासनाशी चर्चेची तयारी असून, कुठलाही प्रश्न चर्चेतून सोडवता येतो. प्रशासनाने आमचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी रवींद्र फडतरे यांनी या वेळी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय T20 संघात थाटात एन्ट्री! सचिन तेंडुलकरचा ३८ वर्षे जूना विक्रम मोडला जाणार

अख्खा खांब अंगावर पडला... 'उधे गं अंबे'च्या सेटवर मयुरी कापडणेचा झालेला अपघात; म्हणाली, 'कुणी माझं कानातलं काढत होतं...'

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर विकेटसाठी तरसला! शिवम दुबेच्या वादळी नेतृत्वाखाली अंधेरी आर्क्सने मुंबई गाजवली!

Investment: गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी SIF ठरणार गेमचेंजर?

Marriage Numerology : मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघताय? 'या' मुलांकाचे लोक बनतात परफेक्ट जावई, सगळ्यांचे मन जिंकतात

SCROLL FOR NEXT