सातारा

खंडाळ्यात आठवडा बाजारासाठी व्यापारी आक्रमक, नगरपंचायतीसमोर ठिय्या

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : येथील बाजारतळावर दैनंदिन व आठवडा बाजार भरवावा यासाठी व्यापारी शहर असोशिएनने केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. यापुढे पूर्वीपासून ठरवून दिलेल्या बाजारतळावरच बाजार भरवला जाईल, असा ठराव मासिक सभेत घेण्यात आला असल्याचे नगरपंचायत मुख्यधिकारी योगेश डोके यांनी सांगितले. यामुळे अनेक दिवसांपासून असोशिएनच्या मागणीला अखेर यश मिळाले. 

दरम्यान, शहर व्यापारी असोशिएनच्या वतीने शुक्रवारी राजेंद्र विद्यालय खंडाळा येथून शहराच्या मुख्य रस्त्याने नगरपंचायत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता. या प्रसंगी घोषणाबाजी करत हा मोर्चा नगरपंचायत येथे पोहचल्यानंतर बाजारतळावर बाजार भरत नसल्याबाबत अनेक व्यापारींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तद्नंतर नगराध्यक्ष व नगरपंचायत मुख्यधिकारी यांनी यावेळी दैनंदिन व आठवडा बाजार हे यापूर्वी सुचित केलेल्या जागी बाजारतळावरच बसवला जाईल. 

तसेच आठवडा बाजाराची व्याप्ती पाहता मूळ गावठाणातील शहरातील अंतर्गत रस्त्यावर फक्त एका बाजूला बाजार भरवला जाणार आहे. मात्र, मुख्य रस्ता रहदारीसाठी मोकळा ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच मासिक सभेच्या विषय क्र. 14 नुसार तसा ठराव ही करण्यात आला असल्याचे नगरपंचायतकडून सांगण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, यावेळी खंडाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शहर व्यापारी असोशिएनच्या मागणीप्रमाणे गावठाणातील पूर्वीपासून भरत असलेल्या बाजारतळावरच बाजार भरवला जाईल. यासाठी विषय क्रमांक 14 वर विषय मंजूर केला आहे.
-योगेश डोके, मुख्यधिकारी, नगरपंचायत खंडाळा

बाजारतळावर बाजार भरविताना सर्व सुख-सुविधा पुरविणार आहे, तरी बाजारतळावरच बाजार भरवावा.
-जितेंद्र गाढवे, अध्यक्ष शहर व्यापारी असोशिएन

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT