Dhangar Reservation Nira River
Dhangar Reservation Nira River esakal
सातारा

Dhangar Reservation : मराठा पाठोपाठ धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला! नीरा नदीत आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न

रमेश धायगुडे

धनगडऐवजी धनगर दुरुस्तीचे शिफारस पत्र राज्यपालांनी दोन दिवसांत द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

लोणंद : धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने गणेश केसकर यांनी लोणंद येथे नगरपंचायतीसमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण आज (ता. २०) पाचव्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान, श्री. केसकर यांच्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी, यासाठी सकल धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने नीरा नदीत (Nira River) दत्त घाटावर जाऊन पाण्यात उतरून तासभर जलसमाधी आंदोलन छेडले.

अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. नीरा नदीवर आंदोलनस्थळी खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील व फलटण विभागाचे पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी आंदोलकांशी चर्चा केली. धनगडऐवजी धनगर दुरुस्तीचे शिफारस पत्र राज्यपालांनी दोन दिवसांत द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

ही मागणी शासनापर्यंत त्वरित पोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यावर जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. यावेळी जलसमाधी आंदोलनात खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे- पाटील, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक ईश्वर ठोंबरे, लोणंदचे माजी नगरसेवक हणमंतराव शेळके- पाटील, शिवाजीराव धायगुडे, पवन धायगुडे, सुखदेव दुरगुडे, दत्तात्रय ठोंबरे, भगवान ठोंबरे आदी मान्यवरांसह अनेकजण सहभागी झाले होते.

धनगर समाजाचे नेते शशिकांत तरंगे, रमेश धायगुडे- पाटील, लोणंद बाजार समितीचे सभापती प्रा. सुनील शेळके, हणमंतराव शेळके, ईश्वर ठोंबरे, पवन धायगुडे आदींनी यावेळी मनोगते व्यक्त करत समाजाची शासनाकडे नेमकी काय मागणी आहे, हे स्पष्टपणाने सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, नगरसेवक सागर शेळके, हर्षवर्धन शेळके- पाटील, संदीप शेळके, विठ्ठल शेळके, अजय धायगुडे- पाटील, विजय धायगुडे, सत्त्वशील शेळके, सरपंच गणेश धायगुडे, ओमकार कर्नवर, अशोक धायगुडे, शंकरराव मर्दाने, कुंडलिक ठोंबरे, राहुल धायगुडे, विकास धायगुडे आदींसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, आमदार दीपक चव्हाण, धनगर नेते शशिकांत तरंगे, माळशिरस तालुक्याचे माजी उपसभापती किशोर सूळ, सतीश कुलाळ, शिवराज पोकळे, बाळासाहेब शेळके, लोणंद येथील समस्त खरात हितकारी संस्थेच्या वतीने अध्यक्ष दयाभाऊ खरात, नगराध्यक्षा सीमा खरात, ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकुमार खरात व समाज बांधव तसेच खंडाळा तालुका नाभिक समाज मंडळाच्या वतीने शंकरराव मर्दाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन गणेश केसकर यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. परिसरातील अनेक नागरिकांनीही पाठिंबा दर्शवला.

उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

दरम्यान, गुरुवारी (ता. १६) पासून बेमुदत उपोषणासाठी बसलेले गणेश केसकर यांची तब्येत आज (ता. २०) पाचव्या दिवशी काहीशी खालावली आहे. त्यांचे अडीच ते तीन किलो वजन घटले असून, पूर्णपणे अशक्तपणा आल्याचे लोणंद प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अलोक बनसोडे व डॉ. श्रद्धा बिचुकले यांनी आज वैद्यकीय तपासणीनंतर सांगितले. दरम्यान, अधिक उपचारासाठी त्यांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

आज दुचाकी रॅली

धनगर समाज आरक्षण जनजागृतीसाठी तसेच धनगर आरक्षणासाठी लोणंद येथे उपोषणाला बसलेले गणेश केसकर यांना पाठिंबा देण्यासाठी आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजल्यापासून मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली अंदोरी, कराडवाडी, वाघोशी, मरिआईचीवाडी, बावकलवाडी, धायगुडे मळा, चव्हाण वस्ती, पिंपरे बुद्रुक, सोनवलकर वस्ती, बाळूपाटलाची वाडी, पाडेगावमार्गे लोणंद येथे पोचणार आहे. अंदोरी येथील भैरवनाथ मंदिरापासून सकाळी नऊ वाजता रॅलीचा प्रारंभ होणार आहे. तरी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन खंडाळा तालुका सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT