Karad-Chiplun Highway Maratha Reservation esakal
सातारा

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आवाहनाला मराठा समाजाचा पाठिंबा; कऱ्हाड-चिपळून महामार्ग रोखला

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी उपोषण सुरु केले आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड-चिपळूण महामार्गावरील साकुर्डी पेठ येथे मराठा समाजाच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कऱ्हाड : ‘मनोज जरांगे-पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘एक मराठा, लाख मराठा’ कोण म्हणतोय देत नाय, घेतल्याशिवाय रहात नाय या ना अशा घोषणा देत मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार कऱ्हाड-चिपळून महामार्ग (Karad-Chiplun Highway) आज शनिवारी साकुर्डी पेठ (जि. सातारा) येथे काहीकाळ रोखून धरण्यात आला.

पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थिनंतर काही काळात त्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली. राज्य सरकारने दिलेले मराठा आक्षणात सग्यासोयऱ्यांचा समावेश करावा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांनी आजपासून शांततेत रास्ता रोको करण्याचे आवाहन राज्यातील मराठा समाजाला केले होते.

त्याला पाठिंबा देण्यासाठी कऱ्हाड तालुका मराठा बांधवांच्या वतीने आज कऱ्हाड-चिपळूण महामार्गावरील साकुर्डी पेठ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही काळ आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकांना रास्ता रोको थांबवण्याचे आवाहन केले. प्रवाशांची होणारी गैरसोयीचा विचार करुन मराठा बांधवांनी काही काळानंतर रास्तारोको स्थगित केला

महामार्गावर वाहनांच्या रांगा

कऱ्हाड-चिपळूण महामार्गावरील साकुर्डी पेठ येथे मराठा समाजाच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कऱ्हाड-चिपळूण महामार्गावरील वाहनांच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT