Maratha Community esakal
सातारा

Maratha Reservation : मराठा समाजाचे चक्री उपोषण तात्पुरते स्थगित; काय आहे कारण, असा का घेतला निर्णय?

मराठा समाजास (Maratha Community) 50 टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे.

हेमंत पवार

सध्या काही जातींना दिलेले आरक्षण हे फुगीर आरक्षण असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकदा सर्वच आरक्षणाच्या लोकसंख्येची शहानिशा करणे गरजेचे आहे.

कऱ्हाड : मराठा समाजास (Maratha Community) ५० टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आजपासून (ता. १३) २०० दिवस चक्री उपोषण आंदोलन कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाने पुकारले होते. त्याची आजपासून येथील दत्त चौकात सुरुवात होणार होती.

मात्र, पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचे कलम लागू केले आहेत. त्याचबरोबर तोंडावर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या समन्वयकांची पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर आजपासून सुरू होणारे मराठा समाजाचे चक्री उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा बांधवांची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे. मात्र, त्या समाजाला गेली अनेक वर्षे आरक्षणाभोवती झुलवत ठेवले आहे. प्रत्येक पक्षाने आजपर्यंत या समाजाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. राज्यकारभार करणाऱ्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून यापूर्वी अनेक मोर्चे शांततेने झाले. राज्यातील प्रत्येक जातीची लोकसंख्या तपासून त्या जातीला आरक्षण दिले पाहिजे.

सध्या काही जातींना दिलेले आरक्षण हे फुगीर आरक्षण असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकदा सर्वच आरक्षणाच्या लोकसंख्येची शहानिशा करणे गरजेचे आहे. त्यातून मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येते हे सांगण्याची वेळ आली, तर आम्ही ते कसे देता येईल दाखवून देऊ. आमची लढाई प्रशासनाची, पोलिसांबरोबर नाही. आमची लढाई ही हक्काची असून, शासनाशी आहे. जालना जिल्ह्यातही आंदोलन सुरू असताना तेथे पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला.

मात्र, तरीही मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले नाही. त्यांनी सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावे, अशी मागणी केली आहे. समाजाच्या समन्वयकांची आज पोलिस उपअधीक्षक ठाकूर, तासगावचे पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर उद्यापासून सुरू होणारे मराठा समाजाचे चक्री उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT