सातारा

उत्तर प्रदेशमधील घटनेचे साताऱ्यात पडसाद; वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर!

उमेश बांबरे

सातारा : उत्तर प्रदेशात वाल्मीकी समाजातील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवत गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, तसेच उत्तर प्रदेशात राष्ट्रपती शासन लागू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. 

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा समन्वयक बाळकृष्ण देसाई, सातारा तालुकाध्यक्ष श्रीरंग वाघमारे, शशिकांत खराटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यासंदर्भात राष्ट्रपतींना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने म्हटले की, उत्तर प्रदेशात सातत्याने दलित व अल्पसंख्याक समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. तेथे कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. 

हाथरस येथील चंदपा गावातील वाल्मीकी समाजातील मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेस जबाबदार असलेल्या नराधमांना कठोरात कठोर कारवाई करावी. त्यासाठी स्वतंत्र तपास यंत्रणा लावावी. तसेच या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या यंत्रणेचा व कुटुंबाला विश्‍वासात न घेता अंत्यविधी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक करावाई करावी, अशी मागणी केली. या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी देशभर तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

IPL 2024 RCB vs DC Live Score : रजतची हाणामारी; दोन सेटबॅकनंतर आरसीबीची दमदार फलंदाजी

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

Covid subvariant: चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 'इतके' रुग्ण आढळले, पुण्यात 51 तर ठाण्यात 20

SCROLL FOR NEXT