सातारा

थकीत बिलासाठी बांधकाम कंत्राटदारांचे गृहराज्यमंत्र्यांना साकडे

कृष्णात साळुंखे

चाफळ (जि. सातारा) : शासकीय बांधकाम कंत्राटदारांची बिले थकित आहेत, ती न मिळाल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांसह मजुरांची यावर्षीची दिवाळी होऊ शकलेली नाही. ही थकित बिले न मिळाल्यास 25 नोव्हेंबरला कंत्राटदार आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वीच तोडगा निघावा, यासाठी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी कंत्राटदार संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष विजयसिंह पाटील यांनी निवेदनाद्वारे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली आहे. 

या निवेदनात म्हटले आहे, की मागील वर्षापासून जिल्ह्यातील, राज्यातील कंत्राटदारांची बिले शासनाकडे थकित आहेत. जिल्ह्यातील व राज्यातील कंत्राटदारांनी बॅंक पतसंस्थांकडून कर्ज काढून कामे पूर्ण केली आहेत. त्या वेळी शासनाकडून पैसे न मिळाल्याने बॅंकांची पतसंस्थेची व्याज वाढत आहेत. अन्य देणीदेखील देणेही अवघड होऊन बसले आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन हजार 500 कोटी, ग्रामविकास विभागाचे 650 कोटी, नगरविकास विभागाचे दोन हजार 700 कोटी, जलसंपदा विभागाची 271 कोटींची बिले शासनाकडे थकित आहेत. 

बिले दिवाळीपूर्वी मिळणे गरजेचे आहे. ती न मिळाल्याने यावर्षी कंत्राटदारांची व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मजुरांची दिवाळी साजरी होऊ शकलेली नाही. त्यामुळे जिल्हा व राज्यातील कंत्राटदार ता. 25 नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. या प्रश्‍नावर तोडगा निघावा, यासाठी शंभूराज देसाई यांनी लक्ष घालावे, बिले मिळवून द्यावीत, अशी कंत्राटदारांची मागणी आहे. निवेदन देण्यासाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष पाटील यांच्यासह उपाध्यक्ष संदीप कोळेकर, सचिव युवराज पाटील, प्रशांत मोरे उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अज्जू रडवलंस यार..! अजिंक्य रहाणे निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना रडला, Video Viral

Ajinkya Rahane Retirement: भारतीय क्रिकेटला मोठा धक्का; माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Viral Video : "बहि‍णींची काळजी घे, आईला दुखवू नकोस..." मृत्यूच्या दारात असलेल्या वडिलांचा चिमुकल्याला शेवटचा संदेश, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेच्या कारवाईला FDA कर्मचारी वैतागले, थेट मंत्र्यांकडेच तक्रार; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT