Agricultural Produce Market Committee election Shambhuraj Desai  sakal
सातारा

Satara : बाजार समितीत परिवर्तनासाठी ताकदीने लढू!

पालकमंत्री शंभूराज देसाई; दौलतनगर येथे निवडणुकीच्या निमित्ताने मेळावा

सकाळ वृत्तसेवा

मोरगिरी : पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधकांच्या ताब्यात आहे. संस्थेचा उपयोग राजकीय फायद्यासाठी करायचा एवढाच कारभार विरोधकांनी केला असून, शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. बाजार समितीच्या निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी देसाई गट पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

दौलतनगर (ता. पाटण) येथे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजिलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज  देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज  देसाई, जयराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव  शेलार, डॉ. दिलीपराव चव्हाण

अशोकराव पाटील, अभिजित पाटील, बबनराव शिंदे, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, बबनराव भिसे, जालंदर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटी सदस्य, व्यापारी, सरपंच, उपसरपंच यांची  प्रमुख  उपस्थिती  होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री करणारी मध्यवर्ती संस्था म्हणून राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला जादा उत्पन्न मिळते.

पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधकांच्या ताब्यात आहे. जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मिळालेल्या सत्तेच्या संधीचा फायदा शेतकऱ्यांना करून देण्यासाठी कृषी बाजार समितीत परिवर्तन घडवून आणावे.’’ या निवडणुकीमध्ये परिवर्तन करण्यासाठी देसाई गटाचा कार्यकर्ते जिद्दीला पेटला, तर विजय मिळवू शकतो, असे देसाई यांनी सांगितले. विजय पवार यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT