सातारा

कायदा-सुव्यवस्थेसाठी आक्रमक भूमिका राहील : अजयकुमार बन्सल

प्रशांत घाडगे

सातारा : पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार अजयकुमार बन्सल यांनी मावळत्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर बन्सल यांनी सकाळी पोलिस मुख्यालयात पोलिस दलातील अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांचा आढावा घेत तपासाच्या अनुषंगाने आवश्‍यक त्या सूचना दिल्या. 

पोलिस अधीक्षक बन्सल हे गुरुवारी दुपारी येथे दाखल झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमादरम्यान कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी बन्सल यांचे स्वागत केले, तर सातपुते यांना निरोप दिला. यानंतर बन्सल यांनी सातारा पोलिस मुख्यालयात येऊन सातपुते यांच्याकडून पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारत पोलिस दलाचा आढावा घेतला. यानंतर बन्सल यांचे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सर्जेराव पाटील व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

जिल्हा रुग्णालयात उपचार सुविधा त्वरित सुरु करा : आमदार शिवेंद्रसिंहराजे
 
शुक्रवारी सकाळी बन्सल यांनी पोलिस मुख्यालयात येऊन कामकाजाची माहिती घेतली. यानंतर त्यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठीच्या सूचना केल्या. साताऱ्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यासाठी आक्रमक राहणार असल्याचे बन्सल यांनी स्पष्ट केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

स्टार प्रवाहच्या आठ मालिकांना आव्हान द्यायला येतायत झी मराठीचे २ नवे मोहरे; टीआरपीमध्ये कोण मारणार बाजी?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT