सातारा

कोरोनासोबत जगायला शिका म्हणणारे वारक-यांच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प : अक्षयमहाराज भोसले

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांनी हाक दिलेल्या देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यास वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचा पाठींबा असून या सोहळ्यास हजारो लोक उपस्थित राहतील यात शंका नाही. वारकरी संप्रदायाच्या प्रश्नावर शासनाने आपले मौन सोडावे असे आवाहन वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केले.

अक्षयमहाराज भोसले म्हणाले, अत्यंत निष्ठेने व शुद्ध आचरणाने जीवन व्यतित करणारे बंडातात्या कऱ्हाडकर हे व्यक्तीमत्त्व वारकरी संप्रदायाची मुलुखमैदानी तोफ आहे. वारकरी आचार धर्म व परंपरा कशा सांभाळले गेले पाहिजे याबाबत बंडातात्यांचा आदर्श आजचा युवक डोळ्यासमोर ठेवतो आहे. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्याला, आवाहनाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोना काळातही संपूर्ण महाराष्ट्रात आठवडी बाजार, व्यापारी पेठा, लग्न समारंभ पूर्णक्षमतेने सुरु असताना फक्त वारकरी उत्सवावरच सरकार निर्बंध लादत आहे. वारकरी वर्गाच्या प्रश्नांना सरकारने सामोरे जाऊन समस्या समजून घेवून त्यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. 

कष्टकऱ्यांच्या चळवळीचा नेता हरपला

अक्षयमहाराज पुढे म्हणाले, पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी कित्येक मॉल्समध्ये हजारो लोक एकावेळी संचार करतात तेव्हा काही अडचण नाही मात्र वारी व तत्सम अध्यात्मिक बाब आली की कोरोना निर्बंध संगितले जातात. शासन एकीकडे स्वतः म्हणते कोरोनासोबत जगायला शिका आणि एकीकडे वारकरी प्रश्न आले की मात्र मूग गिळून गप्प बसते. आदरणीय तात्यांना व वारकरी शिष्ट मंडळाला भेटून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. 
 

उषःकाल हाेता हाेता काळ रात्र झाली...! साता-यात खाद्यपदार्थ विक्रेते पाॅझिटीव्ह

संतभूमी म्हणून संपूर्ण विश्व ज्या राज्याकडे पाहते अशा महाराष्ट्रात आंदोलनाची वेळ वारकरी संप्रदायावर येणे यासारखे दुर्दैव कोणतेच नाही. येत्या आषाढीपर्यंत जे भाविक कोरोना लस घेतील अशांना लसीकरण पत्र पाहून शासनाने प्रवेश द्यावा व याची तयारी सरकारने आतापासून करावी. लसीकरणात सामजिक व अध्यात्मिक संस्था यांना शासनाने सहभागी करुन घेतले तर ते काम तातडीने होईल. लसीकरणानंतरचे फोटो काढण्याचे चोचले शासनाने बंद करावेत व तो वेळ इतर लोकांच्या लसीकरणात घालवावा. सरकार सुज्ञ आहे समाजहितकारक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. वारकरी संप्रदाय शासनास कायम सहकार्य करत आले आहे व पुढेही सहकार्य करेल. मात्र शासनाने देखील समनव्याची भूमिका घेवून मौन सोडण्याची आवश्यकता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Education : दहावी, बारावी उत्तीर्णतेसाठी आता 33 टक्के गुणांची मर्यादा; राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल, कधीपासून नियम लागू होणार?

Kolhapur Municipal Scam : खड्ड्यातच पाडला 'ढपला'; कोल्हापूरच्या आयुक्तांनी थेट घोटाळेबाज ५ अभियंत्यांचा पगारवाढ थांबवण्याचा दिला आदेश

Latest Marathi News Live Update : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग; 6 नोव्हेंबरला प्रकाशित होणार प्रारूप मतदार यादी

Panchang 16 October 2025: आजच्या दिवशी सत्पात्री व्यक्तीस हळद, साखर, पिवळे धान्य, पिवळे वस्त्र दान करावे

कार्यकारी समितीची निर्णय! ‘शनैश्वर’ च्या दोन कार्यालयांचे सील काढले; विश्वस्त उच्च न्यायालयात दाद मागणार

SCROLL FOR NEXT