Crime sakal
सातारा

Satara Crime : मद्य परवाना देण्याचे आमिष; ७५ लाखांचा गंडा, फसवणूकप्रकरणी चौघांना अटक

वेशांतर करून वेगवेगळ्या राज्यात वावरणाऱ्या भामट्याला बंगळूर येथे महामार्गावर ट्रॅफिक जाम करून पोलिसांनी शिताफीने पकडले.

सकाळ वृत्तसेवा

सातारा - चंद्रपूर जिल्ह्याचा मद्य परवाना नावावर करून देण्याचे आमिष दाखवून ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा वर्षांपासून पोलिसांना पाहिजे असलेल्या संशयितासह चौघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. यामध्ये वेशांतर करून वेगवेगळ्या राज्यात वावरणाऱ्या भामट्याला बंगळूर येथे महामार्गावर ट्रॅफिक जाम करून पोलिसांनी शिताफीने पकडले आहे.

विनायक शंकर रामुगडे (वय ४४, रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड), कलावती ऊर्फ प्रिया रामचंद्र चव्हाण (वय ४३, मूळ रा. कोरेगाव, सध्या रा. शाहूनगर गोडोली), अनुजा मंगेश जाधव (वय २६, रा. चंदननगर, कोडोली), कुणाल अंबर भांडे (वय २४, रा. शाहूनगर, गोडोली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दहा मोबाईल, अनेक सिमकार्ड, बनावट ओळखपत्रे केसांचे विग असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली आहे. तेथील मद्य परवाना सातारा जिल्ह्यात हस्तांतरित करावयाचा आहे, असे सांगून एका भामट्याने एका महिला साथीदाराच्या साह्याने येथील एका मोठ्या व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. त्यासाठी त्यांनी त्याच्याकडून वेळोवेळी ७५ लाख रुपये घेतले होते. नऊ वर्षांपूर्वी पैसे घेऊन संशयित पसार झाले होते. संबंधित व्यावसायिकाने वेगवेगळ्या ठिकाणी शोधाशोध घेऊन त्यांच्याशी संपर्क झाला नाही, त्यामुळे त्याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने याचा तपास सुरू केला. पोलिसांनी सातारा, मुंबई, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून संबंधितांची वर्णने पाठवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, कऱ्हाड येथील संशयित धूर्तपणे सातत्याने मोबाईल नंबर बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा आढळून येत नव्हता. त्याने अशाप्रकारे कोरेगाव, पुणे, मुंबई व अन्य राज्यांतील शेकडो लोकांची अशाच आमिषाने साधारण तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

दरम्यान, सातारा पोलिसांना एका चारचाकी वाहनाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बंगळूर येथे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सापळा रचला. रामुगडे याला वाहतूक कोंडी करून ताब्यात घेतले.

चौकशीत कलावती चव्हाणचे नाव पुढे आले. तिला पुणे येथून अटक करण्यात आली. त्यांना मदत करणाऱ्या अन्य संशयितांनाही पोलिसांनी अटक केली. रामुगडे हा गेल्या सहा-सात वर्षांपासून पसार होता.

त्यामुळे या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी शहर पोलिसांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT