फलटण शहर (जि. सातारा) : भुयारी गटार योजनेच्या पाइपलाइनचे काम शहरात सुरू असून, सर्व भागातील रस्ते पाइपलाइन टाकण्यासाठी उकरलेले आहेत. उकरलेले रस्त्यांचे डांबरीकरण न केल्याने मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक जखमी होत आहेत. हे रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नगरपालिकेसमोर विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
पालिकेसमोर धरणे आंदोलनामध्ये समशेरसिंह निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव, सचिन सूर्यवंशी (बेडके), सचिन अहिवळे, अनुप शहा, महेंद्र सूर्यवंशी (बेडके), डॉ. सुभाष गुळवे, जयकुमार शिंदे, राजेश शिंदे, डॉ. प्रवीण आगवणे, पंकज पवार, तुकाराम शिंदे, नगरसेविका मदलसा कुंभार, मीना नेवसे, मंगलादेवी नाईक निंबाळकर, ज्योती खरात, मंगेश आगवणे, वसीम मणेर, लक्ष्मण अहिवळे, तेजस काकडे, सादीक कुरेशी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. शहरात भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे. त्याचा त्रास पादचारी व वाहतूकदार आणि व्यापाऱ्यांना होत आहे. रस्ता खुदाई केल्यानंतर व काम वेळेत पूर्ण होताच रस्त्याचे पॅचवर्क करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून, त्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. सर्व रस्त्यांची कामे सुरू होत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या आंदोलनास खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याशी चर्चा करून रस्ते मंजूर नाही तेथे सर्वेक्षण करून निधी मंजूर केल्यानंतर भुयारी गटार योजनेचे काम सुरू करावे. रस्ते मंजूर आहेत तेथे डांबरीकरणाच्या सूचना दिल्या. या वेळी मुख्याधिकारी काटकर यांनी शहरात 15 कोटी रस्त्यांच्या डांबरीकणासाठी मंजूर झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची निविदा मंजूर होताच काम सुरू होणार असल्याचे सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.