Chief Minister Uddhav Thackeray esakal
सातारा

मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे पुण्याकडे रिटर्न

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचा कोयनानगर दौरा आज रद्द झाला.

कऱ्हाड (सातारा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचा कोयनानगर दौरा आज रद्द झाला. खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकाॅप्टर परत पुण्याकडे रवाना झाले आहे. जोराचा पाऊस, वारा व ढगाळ वातावरणाने दौरा रद्द झाल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याला ढगाळ वातवरणाचा फटका बसला असून मुख्यमंत्री ठाकरे कोयनानगरच्या दौऱ्यावर येण्यासाठी निघाले होते. मात्र, ढगाळ वातावरण व मुसळधार पावसामुळे त्यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे गेले आहे. (Ambeghar Landslide Chief Minister Uddhav Thackeray Visit To Koynanagar Cancelled bam92)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर पुण्याकडे परत फिरले, असले तरी दौरा रद्द झालेला नाही, असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने सकाळपासूनच सर्व विभागांचे अधिकारी कोयनेत ठाण मांडून बसले होते. हेलिकॉप्टर कोयनेत आले व घिरट्या घालू लागले. मात्र, खराब हवामानामुळे ते उतरू न शकल्याने हा दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दौरा रद्द झाल्याचे अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने सर्व अधिकारी पावसातच मुख्यमंत्र्यांची वाट पहात थांबले होते.

सध्या कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, हेलिकॉप्टर पुण्याकडे परत फिरले असले तरी दौरा रद्द झालेला नाही. असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा दौऱ्यावर येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT