shekru sakal
सातारा

पाचगणीत दुर्मिळ शेकरू संख्येत वाढ

स्वतंत्र अभयारण्याद्वारे पर्यटनाची न्यारी मेजवानी देता येईल?; वन विभागाने लक्ष देण्याची गरज

सुनील कांबळे

पाचगणी : या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, फळांच्या शोधात धावणाऱ्या व अगदी दुर्मिळरित्या दृष्टीस पडणाऱ्या शेकरूंचे होणारे नित्याचे दर्शन व ‘माणसाळलेले स्वरूप'' पाहून प्राणी व निसर्गप्रेमींना एक न्यारी मेजवानी मिळत आहे. शेकरूंच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, निरीक्षण करून स्वतंत्र अभयारण्याची उभारणी करून पर्यटनाची न्यारी मेजवानी देता येईल का? याकडे वन खात्याने लक्ष केंद्रित करण्याची निसर्ग अन्‌ प्राणिप्रेमींची मागणी होत आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या व थंड हवेच्या या ठिकाणाने मनुष्याला जणू मनसोक्त आनंद देण्याचे व्रतच स्वीकारल्याने पर्यटक पाहुण्यांची येथे रेलचेल नेहमीच सुरू असते. घनदाट जंगलात वन्यप्राण्यांच्या वास्तव्यास मुबलक परिसर उपलब्ध असला तरी अलीकडच्या काळात रानगवे, रानडुकरे, मोर, काळवीट यांचा सर्रास वावर मानवी वस्तीत वाढला आहे. या भागात पूर्वी दृष्टीस पडणाऱ्या वानरांच्या संख्येला बाजूला करून लाल तोंडाच्या माकडांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पूर्वी जादूचे प्रयोग करण्यासाठी येणाऱ्या मदाऱ्यांकडेच दिसणारी माकडे लवाजम्यात आता विविध प्रेक्षणीय स्थळांवर, तसेच रहदारीच्या ठिकाणी आढळून येत आहेत.

तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या मात्र या परिसरात दुर्मिळरित्या दृष्टीस पडणाऱ्या व रानआंबा, अंबाडा, किंजळ, रानबिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, चांदाडा, उंबर, जांभूळ या झाडांवर राहून त्याच झाडांच्या फळांचा शोधात असलेल्या शेकरूंचा या भागातील वावर कुतूहलाचा विषय ठरला असताना अलीकडच्या कालावधीत खारुताईच्या रूपातील दिसायला मोठी व तांबूस रंगांच्या शेकरूंचा वावर मोठ्या संख्येने शहराच्या विविध ठिकाणी होऊ लागल्याचे प्राणी व निसर्गप्रेमी सांगतात. सरसर झाडावर, झरझर खाली, चपळाईने या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर धावणाऱ्या, झुपकेदार शेपटी, टूकू टूकू बघत मान हलवित व ज्याला महाराष्ट्र राज्याने ''राज्यप्राणी'' म्हणून मान्यता दिलेला व अगदी मनुष्याच्या आवाजाने व सावलीला घाबरणारा ‘हा'' पाहुणा चक्क आपल्या पान ४ वर

गुरेघर परिसरात अस्तित्व स्पष्ट

काही महिन्यांपूर्वी लाखात एक अशा प्रमाणात आढळणाऱ्या पांढऱ्या शेकरूचा वावर गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथे दृष्टीस पडल्याने त्याचे येथील अस्तित्व स्पष्ट झाले आहे तर शहरी भागातील खारुताईप्रमाणे या प्राण्यांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे का? याकडे वनखात्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित करून, निरीक्षणकरून भविष्यात भीमाशंकरसारखे स्वतंत्र अभयारण्य उभारून पर्यटकांना एक न्यारी मेजवानी देता येईल का? याविषयी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी प्रणिप्रेमी व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT