Satara Sakal
सातारा

खंडाळा कारखान्याची उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा

प्रथम येणाऱ्या १०० सभासदांनाच प्रवेश

अशपाक पटेल

खंडाळा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना खंडाळा-म्हावशी या संस्थेची सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता.३०) दुपारी तीन वाजता येथील राजेंद्र विद्यालयात कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

कोरोना काळातील शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार या वार्षिक सभेच्या उपस्थितीबाबतची मर्यादा असल्याने प्रथम येणाऱ्या १०० सभासदांनाच सामाजिक अंतर ठेवून सभेस उपस्थित राहता येईल व उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना मास्क असणे अनिवार्य असणार असल्याचे संचालक मंडळाच्या आदेशानुसार कळविण्यात आले आहे.

सभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या कामकाजाबद्दल संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक स्वीकारून त्यास मंजुरी देण्यात येणार असून, वैधानिक लेखापरीक्षकाकडून आलेला सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा हिशोब तपासणी अहवाल व त्यानुसार संचालक मंडळाने सादर केलेला दोषदुरुस्ती अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे, तसेच वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरवणे या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच उपसचिव महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मुंबई यांच्या आदेशानुसार सभासदांच्या भागाची दर्शनी किंमत दहा हजारांवरून १५ हजार रुपये करणे व त्यानुसार संचालक मंडळाने पोटनियमामध्ये दुरुस्ती करण्याबाबत केलेल्या शिफारसीवर विचार करणे. येणेबाकी वसुलीसाठी व कर्जउभारणीसाठी विचार करणे व अनुपस्थितीबाबत क्षमापित करणे यांसह आदी विषयांवरही चर्चा होणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने ही सभा भरविण्यात येईल. यास गणपूर्तीची आवश्यकता भासणार नाही, असे कळविण्यात आले आहे. सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष, संचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT