सातारा

साताऱ्याच्या व्यावसायिकाचा झटका, सरपंच महिलेला पतीसह बेड्या, सदस्यही जाळ्यात

विजय लाड

कोयनानगर (जि.सातारा) : रासाटीमध्ये (ता. पाटण) हस्तकला व एम्ब्रोडरी व्यवसाय करण्यासाठी जागेचा "ना हरकत' दाखला देण्याचा ठरावाची प्रत देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रासाटीच्या महिला सरपंचासह त्यांचे पती व ग्रामपंचायत सदस्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले. या प्रकरणी तिघांनाही नुकतीच अटक करण्यात आली आहे.
पर्यटकांनाे, सेल्फीपेक्षा जीव मोलाचा..! 
 
रासाटीच्या लोकनियुक्त सरपंच सुरेखा कदम, त्यांचे पती बंडू कदम व सदस्य सचिन कदम अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. रासाटी ग्रुप ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंचासह एक सदस्य एका गटाचे, तर बहुमतात दुसरा गट आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथील एका व्यावसायिकाने रासाटी येथे व्यवसायासाठी जागा मिळावी म्हणून ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. रासाटी ग्रामपंचायतीची 29 जूनला मासिक बैठक झाली. त्यात तो ठराव बहुमताने मंजूर झाला. बहुमताने मंजूर झालेला दाखला ता. तीन जुलैला तयार झाला. मात्र, तो संबंधितांना देण्यात आला नाही.

लाॅकडाउन इफेक्ट : एसपी तेजस्वी सातपुते ही गाेष्ट गांभीर्याने घेतील ? 

जर्मनीतील दांपत्याचा भारतात ग्रामदेवीची यात्रा टाळून वृक्षारोपणासाठी निधी!

ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी सरपंच व सदस्याने तो आपल्याकडेच ठेवला. या ठरावाची प्रत देण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्यानंतर तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश जगताप यांनी सापळा रचला. मागणी केलेली रक्कम मिळाल्यानंतर दाखला देण्यात येणार असल्याने तक्रारदाराने दाखल्यासाठी ठरलेल्या 15 हजारांपैकी दहा हजार रुपये ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम यांना दिली. ही रक्कम स्वीकारतानाच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर सरपंच व त्यांच्या पतीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT